ETV Bharat / bharat

Javelin Thrower Neeraj Chopra : नीरज चोप्राने मोडला राष्ट्रीय विक्रम, 89.94 मीटर भाला फेकत जिंकले रौप्य पदक

author img

By

Published : Jul 1, 2022, 1:15 PM IST

Javelin Thrower Neeraj Chopra
Javelin Thrower Neeraj Chopra

नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये ( Diamond League ) चमकदार कामगिरी करताना रौप्यपदकावर कब्जा केला आहे. स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम हंगामात 89.94 मीटरचा विक्रमी भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे.

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Javelin Thrower Neeraj Chopra ) सातत्याने नवनवे विक्रम करत आहे. डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी करताना त्याने रौप्यपदकावर कब्जा केला ( Neeraj Chopra won the silver medal ) आहे. स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम हंगामात त्याने 89.94 मीटरच्या विक्रमी भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे.

यासह त्याने गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला ( Neeraj broke his own national record ) आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी नीरजने फिनलंडमध्ये झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकून करून राष्ट्रीय विक्रम केला होता.

डायमंड लीगमध्ये नीरजची कामगिरी -

पहिला प्रयत्न - 89.94 मीटर

दुसरा प्रयत्न - 84.37 मीटर

तिसरा प्रयत्न - 87.46 मीटर

चौथा प्रयत्न - 84.77 मीटर

पाचवा प्रयत्न - 86.67 मीटर

सहावा प्रयत्न - 86.84 मीटर

हेही वाचा - ENG vs IND 5th Test : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटीला सुरुवात, जसप्रीत बुमराह करणार भारताचे नेतृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.