ETV Bharat / bharat

ENG vs IND 5th Test : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटीला सुरुवात, जसप्रीत बुमराह करणार भारताचे नेतृत्व

author img

By

Published : Jul 1, 2022, 11:54 AM IST

IND
IND

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी ( India Vs England 5th Test Match ) सामना 1 जुलैपासून (शुक्रवार) बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर सुरू होत आहे. या सामन्याने गेल्या वर्षी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचा समारोप होईल. या मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. यापूर्वी टीम इंडियाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आता जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा नवा कर्णधार असेल. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली.

बर्मिंगहॅम: इंग्लंड आणि भारत यांच्यात शुक्रवारपासून पाचवा कसोटी सामना ( ENG vs IND 5th Test ) खेळवला जाणार आहे. शेवटच्या दौऱ्यात हा सामना पुढे ढकलण्यात आला होता, जो नंतर 1 ते 5 जुलै दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे आणि शेवटचा सामना जिंकून किंवा अनिर्णित राहून मालिका जिंकण्याचा त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न असेल. या सामन्यात भारतीय संघ वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली उतरेल. जसप्रीत माजी खेळाडू कपिल देव यांच्यानंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.

त्याचबरोबर इंग्लंड संघासमोर विजयाशिवाय दुसरा पर्याय नाही. मालिका पराभव टाळण्यासाठी त्यांना भारतावर कसा तरी पराभव करावा लागेल. अशा परिस्थितीत जबरदस्त सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते.या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा संघासोबत नसेल. त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे ( Captain Jaspreet Bumrah ) सोपवण्यात आली असून तो प्रथमच भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे.

रोहितची अनुपस्थिती हा भारतासाठी मोठा धक्का आहे, कारण तो फलंदाज म्हणून या मालिकेत आपल्या संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज होता. त्याच्याशिवाय केएल राहुलही संघाचा भाग नाही. अशा स्थितीत माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ), चेतेश्वर पुजार आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर फलंदाजीची अतिरिक्त जबाबदारी असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला सपोर्ट करण्यासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर आहेत. भारताकडे फिरकीचा पर्याय म्हणून रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा आहेत.

नवा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यामुळे इंग्लंडचा संघ खूपच आक्रमक दिसत आहे. अलीकडेच त्याने मालिकेत न्यूझीलंडचा वाईट पराभव केला. संघातील बहुतांश प्रमुख खेळाडू सुस्थितीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे भारतासाठी ही स्पर्धा सोपी असणार नाही. या सामन्यासाठी इंग्लंडने आधीच त्यांचा संघ जाहीर केला आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

इंग्लंड (आधीच घोषित) : अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड , जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.

भारत : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋषभ पंत (वीसी), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

खेळपट्टी आणि हवामानाची माहिती -

बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन हे फलंदाजांसाठी अनुकूल आहे आणि प्रथम फलंदाजी करून किमान 350 पेक्षा अधिक धावा करणे योग्य ठरेल. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाचा हस्तक्षेप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंड ( ENG vs IND ) 5व्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सोमवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता थेट प्रक्षेपण केले जाईल. सोनी लिव्ह ऍप्लिकेशनवरही सामना पाहता येईल.

हेही वाचा - जोकोविचचा कोक्किनाकिसवर विजय, विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.