ETV Bharat / bharat

काय आहे म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण, मुंबईच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

author img

By

Published : Aug 26, 2021, 1:42 PM IST

Updated : Aug 30, 2021, 6:49 PM IST

Mysore Gang rape case
म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण

देशात महिलांवर व मुलींवरील बलात्काराच्या घटना घडत आहेत. काही घटनांमध्ये तर पाशवीपणाच्या मर्यादाही ओलांडल्या गेल्या आहेत. कर्नाटकाच्या म्हैसूरमध्ये पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे

म्हैसूर - निर्भयाच्या आरोपींना फाशींची शिक्षा दिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल, असे आशादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र, ही आशा फोल ठरल्याचे दिसत आहे. देशात महिलांवर व मुलींवरील बलात्काराच्या घटना घडत आहेत. काही घटनांमध्ये तर पाशवीपणाच्या मर्यादाही ओलांडल्या गेल्या आहेत. कर्नाटकाच्या म्हैसूरमध्ये पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर म्हैसूर आहे. म्हैसूर शहरापासून 13 कि.मी दूर असलेल्या चामुंडी टेकडीवर पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. दोघजण एकातांत बसले होते. यावेळी आरोपींनी त्या दोघांचे मोबाईलवर खासगी क्षण चित्रित केले.

आरोपी दोघांजवळ गेले आणि त्यांना व्हिडिओ दाखवत धमकावले. पीडिताकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाने ते दोघेही घाबरले होते. आपल्या जीवासाठी त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र, 2 वाजेपर्यंत पैशांची जुळवाजुळव पीडित करू शकले नाही. यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी तरुणाला दगडाने मारले. दोघांना मरणाअवस्थेत सोडून पीडितेचा मोबाईल घेत आरोपींनी पळ काढला.

पीडित तरुणी आणि तरुण दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व आरोपी दारूच्या नशेत धुंद होते. त्यांचे वय 20 ते 30 असे होते. ते आपसात कन्नड भाषा बोलत असल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आरोपी स्थानिकच असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चौकशी -

कर्नाटक पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांना तिथे काही बियर बॉटल सापडल्या. पोलीस परिसरात असलेल्या बियर शॉपमधून सीसीटीव्ही फूटेज घेणार असून आरोपींना शोधतील. या प्रकरणी सविस्तर माहिती उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. ही एक नाजूक बाब आहे. सर्व माहिती उघड करू शकत नाही. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया -

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले. ही एक दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एडीजीपी प्रताप रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हैसूरला पाठवले आहे. मीही म्हैसूरलाही जाईन. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतले संज्ञान -

राष्ट्रीय महिला आयोगाने म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कर्नाटक पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून आरोपींना लवकरात लवकर पकडून पीडितेला न्याय द्यावा, असे म्हटलं आहे. तसेच कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही याप्रकरणी पत्र पाठवण्यात आले आहे. एफआयआर नोंदवला गेला असताना अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कर्नाटक पोलिसांनी वेगाने तपास करून न्याय द्यावा, असे रेखा शर्मा यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं. बलात्कार प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व एडीजीपी प्रताप रेड्डी करत आहेत.

हेही वाचा - गोव्यात सात महिन्यांत महिला अत्याचारांच्या दीडशे घटना, सर्वाधिक घटना बलात्काराच्या

हेही वाचा - #JeeneDo : क्रौर्याची परिसीमा अन् हादरून टाकणाऱ्या देशातील बलात्काराच्या आजवरच्या घटना

हेही वाचा - #JeendeDo महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया

Last Updated :Aug 30, 2021, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.