ETV Bharat / bharat

#JeendeDo महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 2, 2021, 9:24 PM IST

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेनंतर वादग्रस्त मत व्यक्त केले. मात्र, असे वादग्रस्त विधान करणारे प्रमोद सावंत एकमेव राजकीय नेते नाहीत. यापूर्वीही राजकीय नेते वादग्रस्त विधाने करून टीकेचे धनी ठरले होते.

महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया
महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया

हैदराबाद - गोव्यामध्ये दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. अल्पवयीन रात्री का बाहेर थांबल्या होत्या, त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी असते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले होते. यापूर्वीही महिलांवरील अत्याचारानंत अनेक राजकीय नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. असे नेते व त्यांच्या विधानांची माहिती घेऊ.

तीर्थ सिंह रावत

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी पदभार स्वीकारताच वादग्रस्त विधाने करण्यास सुरुवात केली. गुडघ्याजवळ फाटलेल्या जीन्सचा संबंध रावत यांनी संस्काराशी जोडला होता. त्यानंतर सोशल मीडियामध्ये रावत यांच्यावर खूप टीका झाली होती.

हेही वाचा- भारत-चीनमधील कॉर्पस कंमाडर पातळीवरील चर्चा विधायक

मुलायम सिंह यादव

बलात्कार प्रकरणावरून समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी करत मोर्चा काढला होता. जेव्हा मुलगा व मुलीमध्ये मतभेद होतात, तेव्हा मुलगी बलात्कार झाल्याचे सांगते. त्यानंतर बिचाऱ्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली जाते. बलात्कार प्रकरणात फाशी द्यावी का ? मुलाकडून चूक होत असते.

शरद यादव

शरद यादव हे 2017 म्हणाले होते, मतांची अब्रु ही मुलींच्या अब्रुहून मोठी असते. जर मुलीला अब्रु दिली तर केवळ गाव आणि गल्लीला अब्रु दिली जाईल. मात्र, एक मतदान विकले तर संपूर्ण देशाची अब्रू विकले जाईल.

हेही वाचा- #JeendeDo गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका, जाणून घ्या, प्रतिक्रिया

कैलाश विजयवर्गीय

महिलांनी श्रद्धा वाढावी, असा शृंगार करावा, उत्तेजना होईल, असे शृंगार करू नये, उत्तेजित होईल असा महिलांनी शृंगार न करता मर्यादेत राहावे. मर्यादाचे उल्लंघन झाल्याने सीतेचे अपहरण झाले.

दिग्विजय सिंह

खासदार मीनाक्षी नटराजन यांना सौ टका टंच माल असे जाहीर कार्यक्रमात दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते.

हेही वाचा-झिकाचा रुग्ण आढळल्याने केंद्राची उच्चस्तरीय समिती महाराष्ट्राला देणार भेट

आझम खान

2019 लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे नेता आझम खान यांनी भाजपच्या नेत्या जया प्रदा यांच्यावर टीका केली होती. आम्ही बोट पकडून रामपूरला ओला. तुम्ही ज्यांच्याकडून नेतृत्व करून घेतले, त्यांचे सत्य जाणण्यासाठी 17 वर्षे लागली. मी 17 दिवसांमध्ये ओळखले. त्यांची अंडरवियर ही खाकी रंगाची आहे.

आसाराम बापू

निर्भया प्रकरणानंतर आसाराम बापू यांनी एका हाताने टाळी वाजत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. जर पीडीतेने गुन्हेगारांना भाई म्हणून हाक मारली असती तर तिची अब्रू आणि प्राण वाचू शकते, असे आसारामने म्हटले होते. आसारामला बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.