ETV Bharat / bharat

Ilma Somesh Marriage Story मुस्लीम तरुणीचा हिंदू तरुणावर जडला जीव: हिंदू धर्मानुसार लग्न करत इलमा झाली सौम्या

author img

By

Published : Jan 13, 2023, 4:21 PM IST

muslim girl married to hindu
मुस्लिम मुलीचे हिंदूशी लग्न

बदाऊन येथील एका मुस्लीम तरुणीने धर्म बदलून हिंदू तरुणाशी लग्न केले. दोघेही एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखत होते. धर्माच्या अडचणीमुळे कुटुंबातील त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होते. मात्र त्यांनी जाती धर्माच्या बेड्या लाथाडत गुरुवारी हिंदू परंपरेनुसार लग्न केले. अगोदरची इलमा आता सौम्या शर्मा बनली आहे. त्यामुळे मुस्लीम तरुणी प्रेमासाठी हिंदू होऊन केलेले लग्न परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : उत्तर प्रदेशच्या बदाऊन जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका मुस्लीम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केले. गुरुवारी संध्याकाळी हिंदू धर्मानुसार दोघांनी लग्न केले. हे प्रेमीयुगुल एकाच गावातील आहे. दोघेही गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. परंतु, वेगवेगळ्या धर्मामुळे त्यांच्या लग्नात अडचण येत होती. कुटुंबातील सदस्यांपुढे त्यांना संघर्ष करावा लागत होता. दरम्यान त्यांनी जात धर्माच्या बेड्या तोडत लग्न केले. त्यांच्या लग्नाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.

दोघांमध्ये धर्माचा अडथळा : बदाऊनच्या परौली गावातील राहणारा सोमेश शर्मा सध्या दिल्लीत खासगी नोकरी करतो. जेव्हा तो त्याच्या गावात शिकत होता. तेव्हा त्या तरुणीशी त्याचे प्रेम संबंध जुळले. मात्र, तरुणी इस्लाम धर्मातील होती. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे होते. एकमेकांसोबत राहायचे होते. पण, धर्माचे बंधन या दोघांमध्ये अडथळा ठरत होते. त्यानंतर दोघांनी घर सोडले. इलमाने तिचा प्रियकर सोमेश शर्मासोबत बरेली येथील अगस्ती मुनी आश्रमात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.

इस्लामचा त्याग करून हिंदू रितीरिवाजांमध्ये लग्न : प्रेयसी इलमाने सोमेशमुळे इस्लाम धर्म सोडला. हिंदू धर्म स्वीकारला. त्यानंतर इलमा सौम्या शर्मा बनली. गुरुवारी संध्याकाळी पंडित केके शंखधर यांनी बरेली येथील अगस्ती मुनी आश्रमात हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांचा विवाह लावला. हिंदू रितीरिवाजांनुसार या जोडप्याचे लग्न लावणारे पंडित केके शंखधर यांनी सांगितले की, या जोडप्याने त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बालपणीची कागदपत्रे दाखवली. तसेच स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर त्यांनी दोघांचे लग्न लावले.

हिंदू धर्म स्वीकारत इलमा झाली सौम्या परौली गावात राहणारा सोमेश शर्मा दिल्लीत खासगी नोकरी करत होता. मात्र त्याचे गावातील इलमासोबत प्रेम होते. त्यामुळे या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लीम असल्याने या दोघांच्या लग्नाला नातेवाईकांचा तीव्र विरोध होता. अखेर या दोघांनी जातीपातीच्या बेड्या झुगारत लग्न केले. अगोदरची इलमा सोमेशच्या प्रेमासाठी हिंदू धर्म स्विकारत सौम्या झाली. त्यामुळे या प्रेमीयुगुलाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

हेही वाचा : Rakhi Sawant Accepts Islam: 'आता परिणाम भोगायला तयार राहा'.. राखी सावंतला हरिद्वारच्या परशुराम आखाड्याकडून धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.