ETV Bharat / bharat

Murder In Patna : पाण्याच्या वादातून एकाची हत्या, संतप्त जमावानं जाळलं आरोपीचं घर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 10:11 PM IST

Murder In Patna
किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या

Murder In Patna : पाटण्यात पाणी सांडण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात (Patna Crime News) आली. गोळी लागल्यानं दोन जण गंभीर झाले आहेत. हत्येनंतर लोकांचा रोष इतका तीव्र झाला की, लोकांनी आरोपीच्या घराला आग लावली. एवढंच नाही तर घराबाहेर उभी असलेली दोन चाकी लोकांनी जाळली.

पाटणा Murder In Patna : बिहारची राजधानी पाटणामध्ये गोळीबार आणि जाळपोळ झाल्याची एक मोठी घटना घडली (Patna Crime News) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाणी सांडण्यावरुन झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात एकाचा मृत्यू (One Killed In Firing) झाला आहे. यानंतर संतप्त लोकांनी गोंधळ घातला आणि अनेक वाहनं पेटवून दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाशीही लोकांनी झटापट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पटनाच्या रुपसपूर पोलीस ठाण्याच्या धनौतमध्ये घडली.

पाण्याच्या गळतीवरुन गोळीबार : घटनेबाबत असं सांगितलं जातं की, धनौत येथील दोन शेजारी पाणी सांडण्याच्या कारणावरुन एकमेकांशी भांडले. यानंतर एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या तिघांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शशिभूषण सिंहचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या लोकांच्या घरावर हल्ला करुन आग लावली.

चार दिवसांपूर्वी शेजारच्या प्रवीणच्या पत्नीशी पाणी सांडण्यावरुन वाद झाला होता. आज प्रवीणनं माझ्या पतीला घरातून बोलावून माझ्यासमोर गोळ्या झाडल्या. मलाही काठीनं मारहाण करण्यात आली आहे – विभा देवी, मृताची पत्नी.

संतप्त ग्रामस्थांनी आरोपीचं जाळलं घर : मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीचं घर जाळलं. तसेच त्याच्या मालमत्तेचं नुकसान करण्यासाठी आरोपीच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. तर घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रुपसपूर, पाटणा येथे गोळीबार झाला आहे. तीन जणांना गोळ्या लागल्या आहेत, एक महिला रॉडनं मारल्यानं जखमी झाली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.- अशोक कुमार, उपनिरीक्षक.

हेही वाचा -

Panipat Rape Murder Case : कारखान्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याला अटक; मृतदेह ठेवला होता कचऱ्यात लपवून

Life Imprisonment For Murder: बायकोला भेटायला सासरी गेला अन् केला तिचा खून; न्यायालयानं सुनावली जन्मठेप

Honor Killing in Mumbai : मुंबईत ऑनर किलिंग; आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं वडील, भावानं तरुणीसह युपीच्या प्रेमवीराला संपवलं!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.