ETV Bharat / bharat

Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार, अनेक बड्या नेत्यांना मिळू शकतो डच्चू!

author img

By

Published : Jul 10, 2023, 7:01 PM IST

Modi
मोदी

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळातून अनेक प्रमुख नेत्यांना वगळले जाऊ शकते, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील भाजप सरकारने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.

अनेक प्रमुख नेत्यांना वगळले जाऊ शकते : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांचा या फेरबदलात मोठा प्रभाव दिसू शकतो. मंत्रिमंडळातून अनेक प्रमुख नेत्यांना वगळले जाऊ शकते, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देखील मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण 5 वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.

भाजपची उच्चस्तरीय बैठक : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटना आणि मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत भाजपची एक उच्चस्तरीय बैठक झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी एल संतोष यांनी भाजप मुख्यालयाच्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक घेतली.

निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती कार्यालयाने या बैठकीबाबत छायाचित्रासह ट्विट केले आहे.

भाजपचे संघटनात्मक पातळीवरही अनेक बदल : यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका तसेच 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक पाहता भाजपने पक्षात संघटनात्मक पातळीवरही अनेक फेरबदल केले आहेत. या प्रक्रिये अंतर्गत भाजप हायकमांडने 4 जुलै रोजी आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि झारखंड या 4 राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली होती. भाजपने माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केली. तर तेलंगणाचे प्रदेशाध्यक्षपद विद्यमान केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना देण्यात आले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुनील जाखड यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. तर झारखंडमध्ये भाजपची कमान राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्याकडे सोपण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. BJP New State President : भाजपने चार राज्यांमध्ये भाकरी फिरवली, आंध्र तेलंगाणासह चार राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.