ETV Bharat / bharat

Opposition MPs Delegation Manipur Visit : 'INDIA' खासदारांच्या शिष्टमंडळांनी घेतली मणिपूरच्या राज्यपालांची भेट

author img

By

Published : Jul 30, 2023, 2:36 PM IST

विरोधी पक्षाच्या खासदारांचे शिष्टमंडळाचा मणिपूर दौरा चालू आहे. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. (इंडिया) विरोधी पक्षाच्या आघाडीतील 21 खासदारांचे शिष्टमंडळाने मणिपूरमधील राजभवनात राज्यपाल्यांची भेट घेतली राज्यपाल अनुसुईया उईके यांना भेटले असून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करावी,अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे.

खासदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
खासदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

इम्फाळ: इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) च्या विरोधी नेत्यांचे शिष्टमंडळ आज मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेतली. विरोधीपक्षाचे शिष्टमंडळ सकाळी राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले होते.

राज्यपालांची भेट घेणार: मणिपूरमध्ये 4 मेपासून जातीय हिंसाचार सुरू आहे. तेथील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे 21 सदस्यीय शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यावी. तसेच तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदाराचे हे शिष्टमंडळ दोन दिवसीय मणिपूरच्या दौऱ्यावर आहे.आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान ते आज मणिपूरचे राज्यपालांना भेटले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात यावी,अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.

  • The delegation of I.N.D.I.A. alliance submitted a memorandum to Manipur Governor Anusuiya Uikey today, requesting her to restore peace & harmony, taking all effective measures. pic.twitter.com/l61l10iOu1

    — ANI (@ANI) July 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले नेते: दरम्यान या शिष्टमंडळाचे भाग असलेले राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा म्हणाले की, राज्यपालांसोबत बैठक करत असताना राज्यात शांतता प्रस्थापित करण्याबाबत त्यांना निवेदन दिले. तसेच शिष्टमंडळाचा एक भाग असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी तेथील परिस्थितीविषयी भाष्य केले आहे. मणिपूरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे त्या म्हणाल्या.

येथील परिस्थिती गंभीर आहे आणि प्रसारमाध्यमांमध्येही त्याचीच चर्चा होत आहे. आम्ही राज्यपालांना एक संयुक्त निवेदन देणार आहोत. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची विनंती त्यांना करणार आहोत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना राज्यातील परिस्थितीबद्दलची माहिती त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना द्यावी अशीही विनंती करणार आहोत. - खासदार सुष्मिता देव

सरकारशी चर्चा करणार: दरम्यान, शनिवारी विरोधी पक्षाच्या या शिष्टमंडळाने सांगितले होते की, ते या दोन दिवसाच्या दौऱ्यात तेथील लोकांना मानसीक धीर देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दरम्यान जातीय हिंसाचारात विस्थापित झालेल्यां स्थानिकांची या शिष्टमंडळाने भेट घेतली. चार मदत आश्रयस्थानांना भेट दिल्यानंतर शिष्टमंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. आपण येथील परिस्थितीविषयी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहोत. तसेच येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सूचना आणि सल्लाही सरकारला देऊ असे या शिष्टमंडळाने सांगितले. दरम्यान केंद्र सरकारने येथील परिस्थिती जाणून घेण्यास आपले शिष्टमंडळ पाठवले नसल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जर पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर मणिपूर राज्याला भेट देतील तर आम्हीही आनंदाने त्यात सामील होऊ, असेही या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान भाजपाने या शिष्टमंडळाला फटकारले आहे. केंद्र सरकार संसदेत मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे, परंतु विरोधक “पळत” आहे, अशी टीका केली आहे.

हेही वाचा-

  1. Sanjay Raut on opposition MPs Manipur: मणिपूरबाबत खालच्या थराला जाऊन भाजपाची टीका म्हणजे आदिवासींचा अपमान-संजय राऊत
  2. Manipur Violence : मणिपूरच्या राज्यपालांची मदत छावण्यांना भेट, 'त्या' दोन महिलांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.