ETV Bharat / bharat

मास्क घातला नाही, म्हणून पाय आणि हातामध्ये ठोकला खिळा; पोलिसांवर आरोप

author img

By

Published : May 26, 2021, 8:10 PM IST

बरेली
बरेली

मास्क घातला नाही, म्हणून आपल्या हातात आणि पायात पोलिसांनी खिळे ठोकल्याचा आरोप पोलिसांवर एका व्यक्तीने केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. पोलिसांची स्वत: ची बाजू मांडली आहे. तर तक्रारदार पोलिसांवर आरोप करत आहे. याचबरोबर रणजीतच्या हातामध्ये खिळा ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीत या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जेणेकरून सत्य कळू शकेल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा होऊ शकेल.

बरेली (उत्तर प्रदेश) - अमानुष वर्तवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीने पोलिसांवर केला आहे. मास्क घातला नाही, म्हणून आपल्या हातात आणि पायात पोलिसांनी खिळे ठोकल्याचे तक्रारदाराने म्हटलं. तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असून संबंधित व्यक्तीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अटेकपासून सुटका मिळावी यासाठी तक्रारदार सोंग करत असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

मास्क घातला नाही, म्हणून पाय आणि हातामध्ये ठोकला खिळा

रणजीत असे पोलिसांवर आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रणजीत आपल्या आईसोबत ठाण्यात पोहचला आणि पोलिसांविरोधात तक्रार केली. शहरातील पोलिसांनी मला मास्क न घातल्यामुळे मारहाण केली. तसेच माझ्या हातात आणि पायात खिळे ठोकले, असा आरोप रणजीतने केला आहे.

man-accused-bareilly-police-of-inhumanity
पोलिसांनी हातामध्ये खिळा ठोकल्याचा तरुणाचा आरोप

दुसरीकडे, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहे. रणजीत लबाड असून खोटे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. रणजीत खोटे बोलत असून मास्क न घातल्यामुळे त्यांच्यावर 323, 504 506 332,353 188, 269, 270 अतंर्गत गुन्हा नोंदवला होता. यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. मात्र, तोपर्यंत तो फरार झाला होता, असे एसएसपी रोहित सिंह सजवाण यांनी सांगितले.

man-accused-bareilly-police-of-inhumanity
मास्क घातला नाही, म्हणून पायामध्ये ठोकला खिळा, तरुणाचा पोलिसांवर आरोप

यापूर्वी रणजित तुरूंगात गेला होता -

रणजीत 2019 मध्ये धार्मिक स्थळाचे नुकसान केल्याप्रकरणी तुरुंगात गेला होता. तसेच त्याने पोलिसांविरूद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण घटकाची बारकाईने चौकशी केली असून अटकेपासून सुटका व्हावी, यासाठी तो सोंग करत आहे, असे एसएसपी रोहित सिंह सजवाण यांनी सांगितले.

पोलिसांची स्वत: ची बाजू मांडली आहे. तर तक्रारदार पोलिसांवर आरोप करत आहे. याचबरोबर रणजीतच्या हातामध्ये खिळा ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीत या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जेणेकरून सत्य कळू शकेल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा होऊ शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.