ETV Bharat / bharat

Maharashtra weather forecast राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता

author img

By

Published : Aug 11, 2022, 8:38 AM IST

Updated : Aug 11, 2022, 2:18 PM IST

काल वर्धा, पुणे जिल्ह्यात Maharashtra weather forecast पाऊस पडला. कोल्हापूरमध्ये पावसाने उसंत घेतली होती. महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत पावासाच Maharashtra rain इशारा देण्यात आला आहे. राज्यातील नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे सातारा या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे आणि रायगडला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra weather forecast
महाराष्ट्र हवामान

मुंबई - राज्यात मान्सूनने आपले रौद्ररूप दाखवणे ( Maharashtra weather forecast ) सुरू केले आहे. गेल्या महिन्यात विदर्भात जोरदार पाऊस आला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर आला होता. यात घरांचे नुकसान झाले होते आणि शेतीही ( Maharashtra rain ) पाण्याखाली आली होती. त्यानंतर काही दिवसांनी वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. पावसाने विदर्भाला ( Vidarbha rain) चांगलेच झोडपून काढले. मुंबई, पुणे नाशिकमध्येही पाऊस बरसला. दरम्यान काल वर्धा, पुणे जिल्ह्यात पाऊस पडला. कोल्हापूरमध्ये पावसाने उसंत घेतली होती. महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत पावासाच इशारा देण्यात आला आहे. राज्यातील नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे सातारा या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे आणि रायगडला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 10 Aug, महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात पावसाचा इशारा ... pic.twitter.com/4ba0yNee2Y

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत काल जोरदार पाऊस - मुंबईत गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार ( Continuous rain in Mumbai for 24 hours ) सुरू आहे. बुधवारी सकाळी मान्सूनने हजेरी ( Mumbai rain ) लावली. भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली, कांदिवली मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर आदी भागात कमी अधिका प्रमाणात ( Mumbai weather ) पाऊस सुरूच होता. मुंबईत आठवडाभर आकाश ( Mumbai rain update ) ढगाळ राहणार असून, सोमवार ते गुरुवारपर्यंत ( Mumbai rain forecast ) मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर शुक्रवारी आणि शनिवारीही मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज विभागाने जारी केला आहे. या आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात नमूद केले आहे. बुधवारी पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नागपुरात मुसळधार पवासाची शक्यता - भारतीय हवामान खात्याने ( Meteorological Department of India ) नागपूर जिल्ह्यात 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ( heavy rainfall possibility in Nagpur ) वर्तवलेली आहे. हवामान खात्याने 8 ते 9 ऑगस्ट या दोन दिवसाकरिता ऑरेंज अलर्ट जाहीर ( orange alert in nagpur district ) केला होता. या दोन्ही दिवसाला अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा ( high rainfall possibility in Nagpur ) देण्यात आला होता. या दरम्यान पावसासोबतच वादळीवारा व वीज पडण्याची शक्यता ( storm, lightning possibility in nagpur ) देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती.

कोल्हापुरात पुन्हा महापुराची भीती - पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढ ( Rise in water level of Panchganga river ) होताना दिसत आहे. एकीकडे पावसाचा जोर कमी झाला असला तरी सद्यस्थितीत पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली ( Panchganga river crossed the danger level ) असून ती आता धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. सध्याची पाणी पातळी 40.9 फुटांवर आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले ( Radhanagari Dam ) असून त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुर ( Flood in Kolhapur district ) येईल, अशी चिंता व्यक्त केली जात असून पावसाचा जोर कमी राहिल्यास हे संकट टळणार आहे.

ऑरेंज अलर्ट - हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यातच दुगारवाडीत पर्यटक अडकल्याची व एकाचा मृत्यू झालाची घटना ताजी आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुढील 3 दिवस जिल्ह्यातील धबधबे व धोकादायक पर्यटन स्थळावर पर्यटनास बंदी घालण्याचे आदेश तहसीलदार आणि वन विभागाला दिले आहे, असे नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी म्हटले आहे.

चंद्रपुरात पूरजन्य स्थिती - चंद्रपूर जिल्ह्यातील पुरजन्य परिस्थिती काही ओसरताना दिसून येत नाही. काही दिवस पावसाने उसंत घेतल्यावर पुन्हा पुरजन्य स्थिती निर्माण होत आहे. मागील तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे तिसऱ्यांदा जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. यामुळे अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तेलंगणा राज्य महामार्ग बंद झाला आहे, तर चंद्रपूरचा गडचिरोली जिल्ह्याशी संबंध तुटला आहे.

Last Updated :Aug 11, 2022, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.