ETV Bharat / bharat

Uttarakhand Election 2022 : हे आहेत उत्तराखंडमधील 'टॉप 5 कोट्यधीश' उमेदवार

author img

By

Published : Mar 9, 2022, 7:09 PM IST

उत्तराखंड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 14 फेब्रुवारीला झाली, गुरुवारी (दि. 10 मार्च) याचे निकाल ( Uttarakhand Election Result 2022 ) सर्वांसमोर येणार आहेत. यंदाची निवडणूक अत्यंत रोमांचित राहिली आहे. भाजप व काँग्रेस या दोन मुख्य पक्षासह आम आदमी पक्षाने मैदानात उडी घेत ही लढत तिहेरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

संपादिच छायाचित्र
संपादिच छायाचित्र

हैदराबाद - उत्तराखंड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 14 फेब्रुवारीला झाली, गुरुवारी (दि. 10 मार्च) याचे निकाल ( Uttarakhand Election Result 2022 ) सर्वांसमोर येणार आहेत. यंदाची निवडणूक अत्यंत रोमांचित राहिली आहे. भाजप व काँग्रेस या दोन मुख्य पक्षासह आम आदमी पक्षाने मैदानात उडी घेत ही लढत तिहेरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

632 उमेदवारांच होणार फैसला - उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 मध्ये 70 जागांसाठी 632 उमेदवार मैदानात उतरले आहेत. 632 उम्मीदवारांमध्ये 202 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे, 314 स्थानिक पक्षाचे तर 137 इतर पक्षाचे तर 123 उमेदवार अपक्ष आहेत.

मैदानात अनेक कोट्यधीश उमेदवार - या निवडणुकीत कोट्यधीश उमेदवारांनी आपले भाग्य आजमवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेते, आजी व माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. उत्तराखंड निवडणूक 2022 मध्ये 632 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 40 टक्के म्हणजेच 252 उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपच्या 70 पैकी 60 उमेदवार कोट्यधीश असून काँग्रेसचे 56, आम आदमी पक्षाचे 69 पैकी 31 उमेदवार, बहुजन समाज पक्षाच्या 54 पैकी 18 उमेदवार तर उत्तराखंड क्रांती दलचे 42 पैकी 12 उमेदवार कोट्यधीश आहेत.

अंतरिक्ष सैनी - काँग्रेसचे उमेदावर अंतरिक्ष सैनी यांनी आपल्या नामनिर्देश पत्रात आपली संपत्ती 123 कोटी असल्याचे सांगितले आहे. अंतिरक्ष सैनी 2017 मध्ये लक्सर विधानसभा मतदारसंघातून बसपाकडून निवडणूक लढवली होती मात्री त्यात त्यांचा पराभव झाला. यंदा ते काँग्रेसशी हातमिळवणी करत निवडणूक लढवत आहेत. ते उच्च शिक्षित असून त्यांच्यावर एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

अंतरिक्ष सैनी
कोट्यधीश अंतरिक्ष सैनी

सतपाल महाराज - कॅबिनेट मंत्री व भाजपचे दिग्गज नेते सतपाल महाराज यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहिती नुसार त्यांच्याकडे 87 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. 2017 मध्ये महाराज भाजपच्या चिन्हावरून चौबट्टाखाल येथून आमदार झाले आहे. सतपाल महाराज यांचे नाव सतपाल सिंह रावत आहे. त्यांनी 2014 साली काँग्रेसचा हात सोडत कमळला साथ दिली. त्यानंतर 2017 साली भाजपच्या कमळ या चिन्हावरून त्यांनी 7 हजार 354 मतांनी राजपाल सिंह बिष्ट यांचा पराभव केला.

कोट्यधीश सतपाल महाराज
कोट्यधीश सतपाल महाराज

मोहन काला - श्रीनगर विधानसभा मतदारसंघातून मोहन काला हे उत्तराखंड क्रांती दल या प्रादेशिक पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 82 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेस गोदियाल व भाजप सरकारमधील मंत्री धन सिंह रावत हे दोन बलाढ्य उमेदवार उभे आहेत.

कोट्यधीश मोहन काला
कोट्यधीश मोहन काला

उमेश कुमार - खानपूर विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे. प्रणव सिंह चॅम्पियन हे या ठिकाणचे भाजप आमदार आहेत. यंदा त्यांची पत्नी रानी देवयानी यांना भाजपने तिकीट दिले आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार उमेश कुमार हे त्यांना टक्कर देत आहेत. उमेश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा स्टींग ऑपरेशन केला होता. त्यामुळे उत्तराखंडच्या राजकारणात भूकंप आले होते. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. याच खटल्यात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यांच्याकडे 54 कोटीची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे.

कोट्यधीश उमेश कुमार
कोट्यधीश उमेश कुमार

शैलेंद्र मोहन सिंघल - 2016 मध्ये काँग्रेस व हरीश रावत सरकारला सुरुंग लावणाऱ्या बंडखोर नेत्यांमध्ये शैलेंद्र मोहन सिंघल यांचे नाव घेतले जाते. 2012 साली जसपूर विधानसभा मतदारसंघातून सिंघल हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण, 2016 साली काँग्रेसचा हात सोड त्यांनी कमळाची वाट धरली. यंदा ते भाजपच्या तिकीटावर पुन्हा जसपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 44 कोटीहून अधिक संपत्ती आहे.

कोट्यधीश शैलेंद्र सिंघल
कोट्यधीश शैलेंद्र सिंघल

हेही वाचा - Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये मतदार राजाचा कौल कुणाला, हरीश रावत यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.