ETV Bharat / bharat

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी 'या' नेत्यांनी केली होती बंडखोरी, उद्या होईल फैसला

author img

By

Published : May 12, 2023, 3:34 PM IST

यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पक्षात बंडखोरी केली. काँग्रेसमध्ये सर्वाधिक 24 उमेदवारांनी बंडखोरी केली तर 13 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये बंडखोरी केली आहे. शनिवारी त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Karnataka Election 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023

बेंगळुरू : यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात बंडखोर उमेदवारांची यादी मोठी आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचे अनेक बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. यातील अनेक नेत्यांची पक्षाने हकालपट्टीही केली आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये सर्वाधिक 24 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या सर्वांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांची पक्षाची प्राथमिक सदस्यता 6 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी 13 हून अधिक लोकांनी भाजपमध्ये बंडखोरी केली आहे. जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात कोण-कोण बंडखोर आहेत.

शिडलघट्टा : चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील शिडलघट्टा मतदारसंघातून काँग्रेसने व्ही. मुनियप्पा यांचे तिकीट कापले. अखेर पक्षाने राजीव गौडा यांना उमेदवारी दिली. अशाप्रकारे राजीव गौडा काँग्रेसमधून नवा चेहरा म्हणून पुढे आले. तर अंजनप्पा हे पक्षाच्या तिकिटासाठी इच्छुक असल्याने त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली. त्यामुळे या निवडणुकीत ते राजीव गौडा यांच्या विजयात अडथळा ठरू शकतात.

मायाकोंडा : दावणगेरे येथील मायाकोंडा मतदारसंघातून आमदार प्रोफेसर लिंगाण्णा यांच्या जागी भाजपने बसवराज नाईक यांना उमेदवारी दिली आहे. नाईक हे माजी आमदार असून, या जागेवरून तिकिटासाठी आणखी 10 इच्छुक असताना त्यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला. हायकमांडने बदललेला चेहरा म्हणून बसवराज नाईक यांना पसंती दिली. यामुळे शिवप्रकाश यांनी येथे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

होसदुर्गा : चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा मतदारसंघात भाजपने गोलिहट्टी शेखर यांच्या जागी एस. लिंगमूर्ती यांना तिकीट दिले. गोलिहट्टी शेखर यांच्यावर सरकार आणि पक्षाच्या नेत्यांवर उघडपणे टीका केल्याचा आरोप होता. त्यांना पक्षाने तिकीट नाकारले. गुलिहाटी शेखर हे देखील त्या आमदारांपैकी एक होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

पुत्तुरु : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरु विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार संजीव माथांदूर यांच्या जागी आशा थिम्मप्पा यांना तिकीट दिले आहे. संजीव माथांदूर यांना पुन्हा निवडणूक लढवायची होती तरी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. तसेच, हिंदुत्ववादी संघटनेचे नेते अरुण पुट्टीला यांना तिकीट देण्यासाठी भाजपवर दबाव होता. मात्र, तिकीट न मिळाल्याने अरुण पुट्टीला यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून भाजपला आव्हान दिले.

चन्नागिरी : भाजपचे विद्यमान आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लोकायुक्त पोलिसांनी लाचखोरी प्रकरणात अटक केली. हा पेच टाळण्यासाठी दावणगेरे मधील चन्नागिरी मतदारसंघात त्यांना तिकीट नाकारण्यात आले. वडिलांना तिकीट न मिळाल्याने मुलगा मल्लिकार्जुनला तिकीट हवे होते. मात्र, मदल कुटुंबातील कोणालाही उमेदवारी न देता पक्षाने एच. एस. शिवकुमार यांना तिकीट देण्यात आले.

मुडीगेरे : अनेक वादांमुळे आमदार कुमारस्वामी यांना चिक्कमगलुरूच्या मूडीगेरे मतदारसंघात भाजपने तिकीट नाकारले होते. त्यांच्या जागी दीपक दोड्डय्या यांना तिकीट देण्यात आले. कुमारस्वामींनी भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते जेडीएसचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि यावेळी पुन्हा विजयाची आशा ठेवून आहेत.

जगलुरू : दावणगेरे जिल्ह्यातील जगलुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार एच. पी. राजेश यांनी काँग्रेसविरोधात बंड केले. येथे बी. देवेंद्रप्पा यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. बेल्लारी जिल्ह्यातील हरपनहल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. एन कोटेश यांना पक्षाचे तिकीट देण्यात आले. येथे केपीसीसीचे सरचिटणीस एम. पी. लता मल्लिकार्जुन यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

हेही वाचा :

  1. Karnataka Election Profile : कर्नाटक विधानसभा निवडणूक; जाणून घ्या, A टू Z
  2. Karnataka Election 2023 : कर्नाटकात शांततेत पार पडले मतदान! 13 मे रोजी होणार फैसला
  3. Karnataka Election 2023 : सिद्धरामय्या यांना टक्कर देण्यासाठी भाजपची मोठी योजना, स्टार प्रचारकांची फळी मैदानात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.