ETV Bharat / bharat

Karnataka Election 2023 : सिद्धरामय्या यांना टक्कर देण्यासाठी भाजपची मोठी योजना, स्टार प्रचारकांची फळी मैदानात

author img

By

Published : May 7, 2023, 8:27 PM IST

कॉंग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या यंदा तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. सिद्धरामय्या यांना आव्हान देण्यासाठी भाजपने व्ही सोमन्ना यांना उमेदवारी दिली आहे. सिद्धरामय्या यांच्याविरोधात भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे.

Karnataka Election 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023

जाणून घ्या काय आहे कर्नाटकच्या वरुणा सीटचे राजकीय समीकरण

म्हैसूर (कर्नाटक) : राज्याच्या हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या वरुणा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री व्ही सोमन्ना यांच्यातील लढतीचे रूपांतर आता अटीतटीच्या लढतीत झाले आहे. फक्त तीन तालुके असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये वरुणा ही जागा तुलनेने लहान विधानसभा मानली जाते. मात्र वरुणा विधानसभेची स्वत:ची अशी राजकीय वैशिष्ट्ये आहेत. गेल्या 15 वर्षांत सिद्धरामय्या यांनी स्वत: ही जागा दोनदा आणि त्यांच्या मुलाने एकदा जिंकली आहे. यावरून त्यांच्या कुटुंबाची या जागेवरील पकड दिसून येते.

भाजप लगावतो आहे पूर्ण ताकद : ही निवडणूक सिद्धरामय्या यांची शेवटची निवडणूक असेल, असे जाणकारांचे मत आहे. सिद्धरामय्या या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. सिद्धरामय्या यांना आव्हान देण्यासाठी भाजपने व्ही सोमन्ना यांना उमेदवारी दिली आहे. या भागात भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. भाजपच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रीय नेते सिद्धरामय्या यांना आव्हान देत आहेत. त्यामुळे ही जागा प्रतिष्ठेच्या लढाईत बदलली आहे. या जागेबाबत भाजप किती गंभीर आहे, याचा अंदाज भाजपचे उमेदवार व्ही सोमन्ना यांच्या प्रचारासाठी आलेल्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या यादीतून कळून येते.

सोमन्नांसाठी स्टार प्रचारक मैदानात : सोमन्ना यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, खासदार श्रीनिवास प्रसाद तसेच चित्रपट कलाकार आणि केंद्रीय नेते सतत प्रचार करत आहेत. स्वत: सोमन्नाही गावोगावी फिरून लोकांना पाठिंब्याची मागणी करत आहेत. एकंदरीत वरुणा मतदारसंघात सरळ लढत आहे. पुढचा आमदार कोण, या प्रश्नाचे उत्तर 10 तारखेला ईव्हीएममध्ये बंद होणार असून 13 मे रोजी मतमोजणीनंतर उत्तर मिळणार आहे. जेडीएस आणि बसपासह इतर पक्षही या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आपला जनाधार शोधत आहेत. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना केवळ मतदारच आहेत जे आपली गुपिते उघड करत नाहीत.

हेही वाचा :

  1. Karnataka Election 2023 : 'कॉंग्रेसचे 2 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन खोटे', कर्नाटकात मोदींचा हल्लाबोल
  2. karnataka elections 2023 : पंतप्रधान भारताच्या सिलिकॉनमध्ये ८ किमीचा रोड शो सुरू, परिसर झाला भगवामय
  3. Wrestlers Protest : शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम, 11 मे पर्यंत न्याय मिळाला नाही तर..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.