ETV Bharat / bharat

JEE Mains results 2023 : जेईई मेन 2023 सत्र 1चा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा

author img

By

Published : Feb 6, 2023, 11:32 AM IST

Updated : Feb 6, 2023, 11:40 AM IST

JEE Mains results 2023
जेईई मेन 2023 सत्र 1चा निकाल

देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, जेईई मेन 2023 सत्र 1चा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. उत्तरपत्रिकेवरील हरकती एकत्र करून अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल.

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन 2023मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अलर्ट आहे. जेईई मेन 2023 सत्र 1चा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 2023 च्या पहिल्या सत्रासाठी अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आहे. याआधी प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली होती. जेईई मेन जानेवारी 2023 अंतिम उत्तरपत्रिका 5 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. ते डाउनलोड करण्यासाठी, jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. NTA ने अद्याप जानेवारीच्या सत्राचे निकाल जाहीर करण्याच्या कोणत्याही तारखेची अधिकृत पुष्टी केलेली नाही. याबाबत लवकरच उमेदवारांना माहिती दिली जाईल.

निकाल तपासण्यासाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध : जेईई मेन्स परिक्षेच्या पहिल्या सत्राची उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जानेवारीत झालेल्या या परिक्षेची उत्तरपत्रिका आपली अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार या पोर्टलला भेट देऊन ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. जेईई मेन्स परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 या दरम्यान घेण्यात आली होती. आता या परिक्षेचा निकाल तपासण्यासाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात.

दुसरे सत्र एप्रिलमध्ये : यावर्षी एनटीएने घोषित केले आहे की जेईई मेन्स प्रवेश परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. या अंतर्गत पहिले सत्र जानेवारीत पूर्ण झाले आहे. आता जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राची नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाइट वर सुरू होईल. दुसऱ्या सत्राची परिक्षा 6 ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12वीमध्ये 75 टक्के गुणांची सक्ती पुन्हा लागू करण्यात आली आहे. दरवर्षी एनटीए आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स परीक्षा घेते. आता यंदाच्या जेईई परिक्षेत पुन्हा एकदा 12 वीमध्ये 75 टक्के गुणांची सक्ती लागू करण्यात आली आहे. मागील ३ वर्षांपासून कोविड-१९ मुळे हा पात्रता नियम काढून टाकण्यात आला होता. या नियमा अंतर्गत 12 वीत सामान्य, EWS आणि OBC साठी 75 टक्के गुण आणि SC-ST साठी 65 टक्के गुणांची पात्रता लागू होती. या परिक्षेला दरवर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी बसतात.

हेही वाचा : JEE Mains Answer Key : जेईई मेन्सच्या पहिल्या सत्राची उत्तर पत्रिका जारी, येथे करा चेक

Last Updated :Feb 6, 2023, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.