ETV Bharat / bharat

Fake Pilot To Impress GF : प्रेमासाठी कायपण; प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी बनला पायलट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 6:51 PM IST

प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी चक्क एक तरुण नकली पायलट बनल्याची घटना वडोदरा विमानतळावर घडली आहे. रक्षित मंगेला असं बनावट पायलट बनणाऱ्या तरुणाचं नाव आहे. वाचा या पठ्ठ्याने याच्या जोरावर किती पोरी पटवल्या...

Fake Pilot To Impress GF
Fake Pilot To Impress GF

वडोदरा : तुम्ही अनेकदा बनावट पोलीस पाहिले असतील. मात्र, प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी चक्क एक तरुण नकली पायलट बनल्याची घटना घडली आहे. या बनावट पायलटला पोलिसांनी विमानतळावरच बेड्या ठोकल्या आहेत. सदरील घटना वडोदरा विमानतळावर घडली आहे. चार गर्लफ्रेंड असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली आहे. तो विमानाजळ फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करत असे, असं देखील तरुणानं पोलिसांना सांगितलं.

प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी बनला नकली पायलट : रक्षित मंगेला असं अटक करत आलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मूळचा मुंबईतील विलेपार्ले येथील रहिवाशी आहे. तरुणाला पायलट व्हायचं होतं. मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्याला पायलट होता आलं नाही. त्यामुळे त्यानं मुंबईतील एका खासगी संस्थेत ग्राऊंड स्टाफचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्याच अधारे प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी या तरुणाने चक्क बनावट पायलट बनण्याचा निर्णय घेतला. फ्लाइटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तरुणाने पायलटच्या वेशात, विमानाजवळ काढलेले फोटो तरुणींना पाठवण्यास सुरुवात केली. तसंच तो विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होता, असं पोलिसांनी सांगितलं.

सुरक्षा यंत्रणांचा खुलासा : या तरुणाने अहमदाबाद, राजकोट, मुंबई, नेदरलँडसह चार गर्लफ्रेंड पटवल्या होत्या. हा तरुण नेदरलँडमध्ये राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीसोबत विमानाने प्रवास करण्यासाठी विमानाचे तिकीट काढत असे. मुलींना इंप्रेस करण्यात माहीर असलेल्या या तरुणाला त्याची एक मैत्रीण हैदराबादमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळं तो हैदराबादला जाण्यासाठी वडोदरा विमानतळावर आला होता.

हर्णी पोलिस ठाण्यात तक्रार : सीआयएसएफने या तरुणाविरुद्ध वडोदरा हर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाला पोलिस ठाण्यात आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली. मात्र या तरुणाने केवळ आपल्या प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने स्वत:ला पायलट सांगून चार मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. हर्णी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या सर्व मैत्रिणींना संदेश पाठवण्यास सांगितलं. त्या संदेशामध्ये (Massage) तरुण पायलट नसल्याचं पोलिसांनी त्याला लिहायला सांगितलं. त्यानंतर तो मेसेज सर्व मुलींना पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला त्याच्या कुंटुंबाच्या स्वाधीन केलं.

हेही वाचा -

  1. Seema Haider News: सीमा-सचिनच्या चित्रपटाचं शीर्षकच इम्पानं नाकारलं; निर्माते म्हणाले, 'मनसेमुळे...'
  2. Tourism Train Coach Fire : पर्यटक रेल्वे गाडीच्या डब्याला आग, मदुराईत ९ प्रवाशांचा मृत्यू
  3. Bihar Rape : आणखी एक 'निर्भया'! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून रस्त्याच्या कडेला फेकले; 72 तासांनी आली शुद्ध
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.