ETV Bharat / bharat

टोकियो ऑलिम्पिकची आज सांगता, बजरंग पुनिया असणार ध्वजवाहक, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज

author img

By

Published : Aug 8, 2021, 5:25 AM IST

etv-bharat-top-
etv-bharat-top-

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल. ईटीवी भारत विशेष बातम्या व एक्सप्लेनरविषयी जाणून घ्या..

आज या घडामोडींवर असणार नजर -

टोकियो ऑलिम्पिकची आज सांगता, बजरंग पुनिया असणार ध्वजवाहक

हैदराबाद - २३ जुलैपासून सुरु झालेल्या टोकियो ऑलिम्पिकची आज सांगता होणार आहे. कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया 8 ऑगस्टला होणाऱ्या सांगता सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) याबाबत माहिती दिली आहे. भारताने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत एक सुवर्णपदकासह ७ पदके पटकावली आहेत.

अजित पवारांची आज पुण्यात कोरोना आढावा बैठक

पुणे- उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पुण्यात कोरोना रुग्ण संख्या स्थिर असल्याने शहरातील निर्बंध कायम आहेत. याच्याविरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याबद्दल या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

खासदास इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद

औरंगाबाद - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद बोलाविली असून त्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

Tokyo Olympics : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! नीरज चोप्राने इतिहास रचला, टोकियोत जिंकलं सुवर्ण पदक

टोकियो - भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकलं. त्याने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. दरम्यान, अॅथलेटिक्स प्रकारात भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिलं पदक आहे. याआधी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय अॅथलीटला करता आलेली नाही. तसेच २००८ ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलं होते. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.वाचा सविस्तर

Golden Boy Neeraj Chopra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, म्हणाले...

टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 87.58 मीटर भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आहे. या मेडलसोबत ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. आज संपूर्ण देश नीरज चोप्रा (Neeraj Chopra Gold Medal) ने सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल जल्लोष करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (pm modi telephonic conversation neeraj chopra) नीरज चोप्राला फोन करुन त्याचे अभिनंदन केले आहे. वाचा सविस्तर

Tokyo Olympics Day 16: एका 'गोल्ड'सह भारताची पदक तालिकेत झेप.. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

हैदराबाद - स्टार अ‌ॅथलीट नीरज चोप्रा ने भालाफेकीत स्वर्ण पदक जिंकत ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच सात पदके जिंकली आहेत. त्यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य तर चार कांस्य पदके सामील आहेत. यापूर्वी भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये ६ पदके जिंकली होती. वाचा पदतालिकेत भारत कितव्या स्थानी

लाव रे तो व्हिडिओ : भाजप-मनसे युतीच्या नादी, पण मोदी-शहांनी राज ठाकरेंना माफ केलंय का?

मुंबई - विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या तोंडातून राज्यातील सत्तेचा घास शिवसेनेने हिरावून घेतला. या धक्क्यातून भाजप अजूनही सावरली नसल्याने शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी सध्या मनसेचा आधार घेण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहेत. राज्यातल्या आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जोरदार तयारी करत असले तरी अनेक मुद्यांवर मनसे आणि भाजप यांची थेट युती होण्याची चिन्हे धुसर असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.वाचा संपूर्ण राजकीय विश्लेषण

राहूल गांधींचं ट्विटर अकाऊंट तात्पुरते बंद

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरकडून तात्पुरते बंद करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डरवरून देण्यात आली. तसेच सध्या त्यांचं अकाऊंट सुरू असून डाटा स्टोअर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यात नमूद केले आहे. मात्र ट्विटरने राहूल गांधींचे ट्विटर अकाऊंट कोणत्या कारणामुळे बंद केले होते, याविषयीचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही.वाचा काय आहे प्रकरण

VIDEO : 8 ऑगस्ट राशीभविष्य : कसा असले तुमचा आजचा दिवास; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य

VIDEO : 'आणि काय हवं'.., पाहा उमेश कामत आणि प्रिया बापट यांची संपूर्ण मुलाखत

'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. मुरांबा फेम वरुण नार्वेकरने या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता त्याच वेब सिरीजचा तिसरा सीझन 6 ऑगस्टपासून एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने मराठीतील फेमस कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी ईटीव्हीशी संवाद साधला. यात उमेशने त्यांच्या केमिस्ट्रीविषयी आणि आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सांगितले. पाहा मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.