ETV Bharat / bharat

इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तावर ड्रोनच्या घिरट्या; भारताने केला निषेध

author img

By

Published : Jul 2, 2021, 3:55 PM IST

भारतीय दुतावास
भारतीय दुतावास

दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे काश्मीरमध्ये एअर फोर्स स्टेशनवर हल्ला केला होता. त्यापूर्वी पाकिस्तानमधील भारतीय दुतावासावर ड्रोन फिरल्याचेही आढळले होते.

नवी दिल्ली - दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये स्फोट केल्यानंतर पाकिस्तानची आणखी कुरापत समोर आली आहे. गेल्या आठवड्यात इस्लामाबादमधील भारतीय दुतावासावर ड्रोन फिरत असल्याचे आढळले होते. या घटनेचा भारताने निषेध केला आहे.

भारतीय दुतावासावर ड्रोन फिरणे म्हणजे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. याबाबत भारतीय दुतावासाने पाकिस्तानच्या यंत्रणेला जाब विचारला आहे. दहशतवाद्यांनी ड्रोनच्या मदतीने जम्मूमधील एअर फोर्स स्टेशनमध्ये २७ जूनला दोन स्फोट घडवून आणले होते. त्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणेत ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-मृत्यूचं तांडव!; कोरोना मृत्यूचा आकडा 4 लाख पार; रिकव्हरी रेट 97.01 टक्के

ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी यंत्रणा करण्याचे काम सुरू- सैन्यदल प्रमुख

सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रोनने देशातील सुरक्षेच्या आव्हानांमध्ये गुंतागुंत वाढली आहे भारतीय सैन्यदलाकडून ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी यंत्रणा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली. ते थिंक टँकमध्ये बोलत होते. सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले, की सुरक्षा आस्थापनांना आव्हानांची माहिती आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. एखाद्या देशाने किंवा देशाने पुरस्कृत करून तयार केलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी यंत्रणा आम्ही विकसित करत आहोत. कायनेटिक आणि नॉन कायनेटिक या दोन्ही प्रकारच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा विकसित होणार आहे.

हेही वाचा-....तर कायद्याचे राज्य नावापुरतेच - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

ड्रोनच्या हल्ल्यानंतर सैन्यदलाकडून खबरदारी

रविवारी जम्मूत हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा जम्मूच्या कालूचक आणि कुंजवानी भागात सैनिकी तळाजवळ दोन ड्रोन घोंघावताना दिसले. भारतीय सैन्याकडून फायरिंग करण्यात आल्यानंतर हे ड्रोन दिसेनासे झाले. सध्या भारतीय सैन्याकडून बेपत्ता ड्रोनची माहिती घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून हेरगिरी आणि हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहेत. कारण, थेट हल्ल्यापेक्षा ड्रोन हल्ले करण्यात हल्लेखोरांना कमी जोखीम उचलावी लागते.

सुरक्षा अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर करून देशात पहिल्यांदाच हल्ला केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.