DK Shivkumar : काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतरही डीके शिवकुमार खूश नाहीत, जाणून घ्या का?

author img

By

Published : May 21, 2023, 9:13 PM IST

DK Shivkumar

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, पक्षाच्या दणदणीत विजयानंतरही मी आनंदी नाही. माझे पुढील लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. म्हणूनच मुख्यमंत्री किंवा माझ्या घरी अभिनंदन करायला येऊ नका.

बेंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर, डीके शिवकुमार यांनी रविवारी सांगितले की, ते पक्षाच्या प्रचंड विजयानंतरही आनंदी नाहीत. आता त्यांचे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे आहे. ते आज बेंगळुरूमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

विधानसभा निवडणुकीत आम्हाला 135 जागा मिळाल्या. पण मी यावर खूश नाही. अभिनंदन करायला माझ्या किंवा सिद्धरामय्या यांच्या घरी येऊ नका. आमचं पुढचं टार्गेट लोकसभा निवडणूक आहे आणि ती निवडणूक आपण चांगली लढली पाहिजे. - डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली : आदल्या दिवशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त बेंगळुरू येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात श्रद्धांजली वाहिली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भारतीय जनता पक्षातील कोणताही नेता दहशतवादामुळे मरण पावला नाही, मात्र ते काँग्रेस पक्ष दहशतवादाला पाठिंबा देतो, असे सांगत असतात.

पंतप्रधान मोदी दहशतवादावर बोलतात. मात्र भाजपच्या एकाही व्यक्तीला दहशतवादामुळे जीव गमवावा लागला नाही. आम्ही दहशतवादाचे समर्थन करतो असे भाजप म्हणतो, पण इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासारखे अनेक काँग्रेस नेते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत - सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

काल झाला शपथविधी : 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या दणदणीत विजयानंतर शनिवारी सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि इतर आठ आमदारांनीही यावेळी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 224 पैकी 135 जागांवर विजय मिळवला असून भाजपच्या खात्यात 66 व जेडीएसच्या खात्यात 19 जागा आल्या आहेत. इतरांना 4 जागांवर विजय मिळाला आहे.

हेही वाचा :

  1. Karnataka 5 Guarantees : सिद्धरामय्यांनी करून दाखवले! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दिली पाच हमीपत्रांना मंजुरी
  2. Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  3. Karnataka New CM Siddaramaiah: कधीकाळी जनता दलाचे नेते ते काँग्रेसमधील तत्वनिष्ठ नेते सिद्धरामय्या, असा आहे कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.