Karnataka New CM Siddaramaiah: कधीकाळी जनता दलाचे नेते ते काँग्रेसमधील तत्वनिष्ठ नेते सिद्धरामय्या, असा आहे कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास

author img

By

Published : May 18, 2023, 11:38 AM IST

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
Karnataka New CM Siddaramaiah ()

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमताने मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विचार मंथनानंतर काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे.

बंगळुरू: सिद्धरामय्या हे कर्नाटकातील स्वच्छ प्रतिमेचे आणि काँग्रेसचे विश्वासून नेते म्हणून देशभर ओळखले जातात. ते आजही पांढर्‍या धोतरात आणि सोनेरी किनारी अंगवस्त्र असलेला पांढरा कुर्ता परिधान केलेले दिसून येतात. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 ही त्यांची शेवटची निवडणूक लढाई असल्याचे त्यांनी घोषित केल्यानंतर त्यांच्या संपूर्ण देशात चर्चा झाली

सुरुवातीपासून सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी डीके शिवकुमार यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जाणून घेऊ, त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ.

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी: सिद्धरामय्या यांचा जन्म 12 ऑगस्ट 1948 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा होबळी येथील सिद्धरामन हुंडी या दुर्गम भागात झाला. सिद्धराय्या हे गरीब शेतकरी कुटुंबातून आले आहेत. ग्रामीण कुटुंबातून आलेले सिद्धरामय्या हे म्हैसूर विद्यापीठातून बीएससी पदवी मिळवणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले होते. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर काही काळ वकिली केली. विद्यार्थीदशेपासून सिद्धरामय्या हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्यावर डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मांडलेल्या समाजवादाचा प्रभाव राहिला आहे. दलित आणि समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय आणि आर्थिक प्रगती मिळवून देण्यासाठी सिद्धरामय्या यांनी राजकारणात प्रवेश केला.

1983 मध्ये विधानसभेत प्रवेश: भारतीय लोक दल पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली. 1983 मध्ये म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून सदस्य म्हणून कर्नाटक विधानसभेत प्रवेश केला. राज्याच्या कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राज्याचे रेशीम राज्यमंत्री पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री, परिवहन मंत्री अशी विविध मंत्रालये त्यांनी हाताळली आहेत.

काँग्रेसच्या ऑफरनंतर पक्षप्रवेश- सिद्धरामय्या समाजाच्या सर्व घटकांमध्ये विशेषतः मागासवर्गीयांचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. 1994 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्नाटक विधानसभेवर पुन्हा निवडून आले. अर्थ आणि अबकारी खात्यासह त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी मागील सरकारचे कर्ज फेडले. त्यांनी स्वत:चा पक्ष सुरू करण्यासाठी जनता दलाचा राजीनामा दिला होता. २००६ मध्ये काँग्रेस हायकमांडच्या प्रस्तावावर त्यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर, एक तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 2013 मध्ये पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले.

या पदांची पार पाडली जबाबदारी

  1. कर्नाटकचे मुख्यमंत्री (वर्ष २०१३)
  2. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री (दोनदा, 1996 आणि 2004)
  3. अर्थमंत्री
  4. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री (1985)
  5. रेशीम व पशुसंवर्धन मंत्री
  6. परिवहन मंत्री
  7. उच्च शिक्षण मंत्री

सिद्धरामय्या यांच्या मुलाचा मृत्यू: सिद्धरामय्या यांना नेहमीच कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांनी पार्वती नावाच्या महिलेशी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. यापैकी पहिला मुलगा राकेश याचा जुलै 2016 अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. अचानक झालेल्या घटनेने त्यांना धक्का बसला. मात्र, त्यांनी खचून न जाता राजकीय कारकीर्दीत सक्रियपणा सुरुच ठेवला. त्यांचा दुसरा मुलगा यतींद्र डॉक्टर आहे.

हेही वाचा-

  1. Siddaramaiah Elected As New CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ
  2. Race for Karnataka CM 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; डीके शिवकुमार म्हणाले, माझी ताकद 135 आमदार!
  3. Karnataka CM decision : कोण होणार कर्नाटकाचा मुख्यमंत्री उत्तरासाठी पाहावी लागेल 72 तास वाट; रणदीप सुरजेवालांनी दिली नवी अपडेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.