ETV Bharat / bharat

कोरोना लशीचा फॉर्म्यूला सार्वजनिक करावा; अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

author img

By

Published : May 11, 2021, 5:21 PM IST

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, की प्रत्येकाला लस मिळण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. तोपर्यंत अनेक लाटा येणार आहेत. त्यामुळे कोरोना लशींचे युद्ध पातळीवर उत्पादन वाढविणे महत्त्वाचे आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना लशीच्या कमतरतेबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने कोरोना लशीचा फॉर्म्युला सार्वजनिक करावा, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लशीचा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर अनेक कंपन्यांना लशींचे उत्पादन वाढविणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, की देशातील केवळ दोन कंपन्यांकडून लशींचे उत्पादन घेण्यात येत आहे. या कंपन्या महिन्याभरात केवळ ६ ते ७ कोटी लशींचे उत्पादन घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. तोपर्यंत अनेक लाटा येणार आहेत. त्यामुळे कोरोना लशींचे युद्ध पातळीवर उत्पादन वाढविणे महत्त्वाचे आहे. सर्वांचे लसीकरण करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन करणे आवश्यक असल्याचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

हेही वाचा-तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की संकटात अनेक कंपन्यांना पीपीई कीटचे उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे लशींचे उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात यावे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.

हेही वाचा-मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा केला नाही -किशोरी पेडणेकर

दिल्लीतील लॉकडाऊन यशस्वी-

दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांचे नवीन प्रकरणे कमी होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन यशस्वी झाल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. जीटीबी रुग्णालयात नवीन ५०० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची कमतरता नसल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला.

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १२,६५१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर सोमवारी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांहून कमी झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.