ETV Bharat / bharat

Corona Third Wave in Goa: गोव्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात, रुग्णवाढीचा दरही दुप्पट

author img

By

Published : Jan 5, 2022, 3:42 PM IST

गोवा कोरोनाची तिसरी लाट
गोवा कोरोनाची तिसरी लाट

गोव्यात दररोज 500 हून अधिकजण कोविड बाधित ( Daily 500 corona cases in Goa ) होत आहेत. राज्यात पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी दर वाढून तो 13 टक्क्यांवर पोहोचला ( Coronas Positivity rate in Goa ) आहे. 28 डिसेंबरपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेला राज्यात सुरुवात झाल्याची माहिती माहिती आरोग्य विभागाने ( Goa Health Ministry on third wave ) मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पणजी - गोवा राज्यात 28 डिसेंबरपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ( Coronas third wave ) झाली आहे. रुग्णवाढीचा दरही दुप्पट झाल्याची माहिती आरोग्य विभागाने ( Goa Health Ministry on third wave ) दिली आहे.

गोव्यात दररोज 500हून अधिकजण कोविड बाधित होत आहेत. राज्यात पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी दर वाढून तो 13 टक्क्यांवर पोहोचला ( Coronas Positivity rate in Goa ) आहे. 28 डिसेंबरपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेला राज्यात सुरुवात झाल्याची माहिती माहिती आरोग्य विभागाने मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे.

हेही वाचा-Night Curfew In Goa : येत्या दोन दिवसांत रात्र संचारबंदी लागू होईल; टास्क फोर्स सदस्य डॉक्टर शेखर साळकर यांचे संकेत



राज्यात 6 नवे ओमायक्रोनचे रुग्ण- आरोग्यमंत्री
राज्यात अजून 6 ओमायक्रोनचे बाधित रुग्ण मिळाले ( more new 6 omicron patients in Goa ) आहेत. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. सहाही रुग्ण युकेतून भारतात आले होते. तेव्हाच ते ओमायक्रोनचे संशयित म्हणून आढळुन आल्याचीही माहिती राणे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

हेही वाचा-गोव्यात कोरोना चाचण्या वाढविण्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आदेश

24 तासांत 592 नवे कोविड बाधित

राज्यात मागील 24 तासांत 592 नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाचे 2, 763 सक्रिय रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी दर 13 टक्क्यांहून अधिक आहे.

नवीन वर्षाच्या प्रारंभीच रुग्णंसख्या वाढत असल्याने आरोग्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

वाढत्या कोविड संसर्गाबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी चिंता व्यक्त केली होती. तज्ज्ञ समितीने सरकारला योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले होते. नववर्षानिमित्त राज्यात येणाऱ्या पर्यटकांकडून कोविडच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. राज्यात येणारे बहुतांश पर्यटक कोणत्याही कोविड नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. हॉटेल्स, कॅसिनो तसेच क्रूझ बोटींवर सर्व नियमांना बगल देत बिनधास्तपणे गर्दी करत होते. दरम्यान नववर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सरकारने व विशेषतः पोलिसांनी नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.