ETV Bharat / bharat

Night Curfew In Goa : येत्या दोन दिवसांत रात्र संचारबंदी लागू होईल; टास्क फोर्स सदस्य डॉक्टर शेखर साळकर यांचे संकेत

author img

By

Published : Jan 4, 2022, 3:23 PM IST

Updated : Jan 4, 2022, 3:34 PM IST

दोन दिवसात रात्र संचारबंदी ( Night Curfew In Goa ) लावण्यात येण्याची शक्यता टास्क फोर्सचे डॉक्टर शेखर साळकर ( Indications of Task Force Doctor Shekhar Salkar ) यांनी वर्तवली आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी ( Goa Curfew from 11pm to 6am ) लावण्यात येणार असून सरकार याविषयीचा अधिकृत अध्यादेश काढणार असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले आहे.

टास्क फोर्सचे डॉक्टर शेखर साळकर
टास्क फोर्सचे डॉक्टर शेखर साळकर

गोवा - राज्यात पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव ( Corona Infection ) वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात रात्र संचारबंदी ( Night Curfew In Goa ) लावण्यात येण्याची शक्यता टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शेखर साळकर ( Indications of Task Force Doctor Shekhar Salkar ) यांनी वर्तवली आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी ( Goa Curfew from 11pm to 6am ) लावण्यात येणार असून सरकार याविषयीचा अधिकृत अध्यादेश काढणार असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले आहे. शिवाय कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद ( School Closed Goa ) करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया देतांना डॉ. शेखर साळकर
  • संचारबंदीवर आज अधिकृत निर्णय

रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लावण्यात येणार असून सरकार याविषयीचा अधिकृत अध्यादेश काढणार असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले आहे. तूर्तास शालेय मुलांचे लसीकरण करण्याविषयी भर देण्यात येणार असून त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच 26 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लावणार असून त्यानंतरचा पुढील निर्णय एक्स्पर्ट कमिटी घेणार असल्याचे साळकर यांनी सांगितले आहे.

  • राज्यात कोविडचा कहर सुरू

नववर्षांच्या स्वागतासाठी राज्यात सुमारे 18 लाखाहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावत कोविड नियम पायदळी तुडवले होते. यात सरकारने घातलेल्या कोविड बंधनाचा पुरता बोजवारा उडाला होता. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या प्रतिदिवशी 600 हुन अधिक कोविड बाधित रुग्ण आढळत आहेत. तूर्तास राज्यात 2240 ऍक्टिव्ह रुग्ण असून पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे.

हेही वाचा - Lockdown In Mumbai: रुग्णसंख्या 20 हजारावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन - महापौर

Last Updated :Jan 4, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.