ETV Bharat / bharat

India Corona Updates : देशभरात मागील 24 तासात 2 लाख 64 हजार रूग्णांची नोंद

author img

By

Published : Jan 14, 2022, 10:51 AM IST

India Corona Updates
India Corona Updates

कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा मोठी उडी पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2,64,202 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 6.7 टक्क्यांनी अधिक आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग दर आता 14.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची ५,७५३ प्रकरणे आहेत.

नवी दिल्ली - गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी देशात कोरोनाचे 16,785 अधिक रुग्ण ( India Corona Updates ) आढळले आहेत. काल कोरोनाचे 2 लाख 47 हजार 417 रूग्णसंख्या होती. त्याचवेळी आज शुक्रवारी 2 लाख 64 हजार 202 नवीन प्रकरणे समोर आली. तर 1 लाख 9 हजार 345 रूग्ण बरे होऊन डिस्चार्ज ( Discharge Covid Patients ) देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Union Ministry of Health ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 72 हजार 73 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८५ हजार ३५० झाली आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी एक लाख 9 हजार 345 लोक बरे झाले. त्यानंतर 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 72 हजार 73 इतकी आहे. गेल्या 24 तासात 315 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 4,85,350 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंत 155 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण -

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत 155 कोटींहून अधिक अँटी-कोरोना व्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल ७३ लाख ८ हजार ६६९ डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत १५५ कोटी ३९ लाख ८१ हजार ८१९ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनची ५४८८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. देशात आतापर्यंत 5 हजार 753 लोकांना ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.