ETV Bharat / bharat

UP CM Yogi Adityanath Interview : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खास मुलाखत

author img

By

Published : Feb 22, 2022, 6:53 AM IST

Updated : Feb 22, 2022, 7:23 AM IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (2022)साठी मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस, सपा, बसपा आणि एआयएमआयएम हे आपापल्या पातळीवर विजयाचा दावा करत आहेत. (CM Yogi Adityanath Exclusive Interview ) एकंदरीत सध्याचे वातावरण काय आहे या सर्व प्रश्नांबाबत ईटीव्ही भारतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खास मुलाखत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खास मुलाखत

उत्तर प्रदेश (लखनऊ) - यूपी विधानसभा निवडणूक (2022)साठी मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस, सपा, बसपा आणि एआयएमआयएम हे आपापल्या पातळीवर विजयाचा दावा करत आहेत. त्यातच पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपही मोठ्या मोठ्या घोषणा करत आहे. (Yogi Adityanath Interview On ETV Bharat) मतदारही आपल्या प्रश्नांना माध्यमांसमोर जोरदारपणे मांडत आहेत. अशा सर्व निडवणूक वातावरणात सत्ताधारी पक्षाची काय भूमिका आहे. (CM Yogi Adityanath Exclusive Interview ) भाजपला किती जागा मिळतील, एकंदरीत सध्याचे वातावरण काय आहे या सर्व प्रश्नांबाबत ईटीव्ही भारतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखात

विकास आणि सुशासन हे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर

तीन टप्प्यातील मतदानानंतर पक्षाची स्थिती काय? या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राष्ट्रवाद, विकास आणि सुशासन हे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर आहेत. त्यांना सुरक्षितता देणारा, दुहेरी गतीने त्यांचे उज्ज्वल भविष्य प्राधान्याने वाढवणारा, प्रत्येक गावाला, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक महिलेला भेदभाव न करता सोयीसुविधांनी जोडणारा, दुहेरी इंजिनाच्या भाजप सरकारचा निर्धार आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीत स्थापन करा आले पाहिजे असही आदित्यनाथ यावेळी म्हणाले आहेत.

दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील एका आरोपीच्या वडिलांचा सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावर आपले मत काय? यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सुरक्षेच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचा इतिहास फार वाईट राहिला आहे. 2013 मध्ये, सपा सरकार सत्तेवर असताना, समाजवादी पक्षाच्या सरकारने त्यावेळी राज्यात यापूर्वी घडलेल्या सर्व दहशतवादी घटनांशी संबंधित दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, सपा सरकारचा संपूर्ण इतिहास आपल्या राजकीय स्वार्थासाठी व्होट बँकेचे राजकारण करण्याचा राहिला आहे. त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केला. असा थेट आरोप मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला आहे.

दहशतवाद्यांच्या निकालानंतर गप्प का?

राज्यातील व्यावसायिक गुंड आणि माफियांना आश्रय देण्याचे काम सपाने केले. सपाचा हा जुना इतिहास आहे आणि सर्वांनाच माहीत आहे. तीन दिवसांपूर्वी गुजरातमधील एका न्यायालयाने बॉम्बस्फोट मालिकेवर निकाल दिला आहे. यामध्ये 38 दोषींना फाशी तर अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यातील नऊ जण उत्तर प्रदेशातील आहेत. राज्यातील बहुतांश दहशतवादी आझमगडमधील संजरपूर गावात आणि आसपास आहेत. संजरपूर येथील एक दहशतवादी, ज्याचा भाऊ देखील दिल्लीतील बटाला हाऊस घटनेशी संबंधित आहे, तो सीरियात पळून गेला आहे आणि तो घोषित दहशतवादी आहे आणि हा एक आहे. त्यांचे वडील सपाचे सक्रिय कार्यकर्ते आणि प्रचारक आहेत. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेवर प्रतिक्रिया देणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव 2013 च्या घटनेवर आणि गुजरातमधील दहशतवाद्यांच्या निकालानंतर गप्प का आहेत, याचे मला आश्चर्य वाटते असही मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

सपाने चार वेळा राज्यात सत्ता काबीज केली

सपा प्रमुख अखिलेश यादव माफियांविरोधातील तुमच्या कारवाईची खिल्ली उडवत तुम्हाला 'बुलडोजर वाले बाबा' म्हणाले याकडे आपण कसे पाहतात? या प्रश्नावर सीएम योगी म्हणाले की, ते असे म्हणतात हे दुर्देवीच आहे. मात्र, सपाने चार वेळा राज्यात सत्ता काबीज केली आहे. त्या काळात त्यांचा कळवळा राज्यातील गरीब, तरुण आणि शेतकरी यांच्याप्रती कधीच नव्हता. त्यांच्या संवेदना दुर्दैवाने दहशतवाद्यांबद्दल आहेत असा थेट आरोपच त्यांनी यावेळी केला आहे. व्यावसायिक माफिया आणि गुन्हेगारांच्या दिशेने, अराजक घटकांकडे, दंगलखोरांच्या दिशेने. व्यावसायिक माफिया आणि गुन्हेगारांच्या मनात भीती राहू नये, म्हणून सपा त्यांना आश्रय देत असते. आम्ही सांगितले ते केले. आम्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई केली आहे. पुढील भाजप सरकार विकास आणि सुरक्षेच्या मुद्यावर तडजोड न करता काम करेल.

दंगलखोरांकडून वसुलीसाठी आम्ही केलेली कारवाई हा प्रशासकीय आदेश होता

तोडफोड आणि दंगलखोरांकडून नुकसानीची वसुली करून तुमचे सरकार देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर सध्या वसुलीच्या नोटिसा मागे घेण्यात आल्या आहेत. तुमचे सरकार पुन्हा आले तर तुम्ही काय करणार? या प्रश्नावर सीएम योगी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले आहे, जे आम्ही आधीच केले आहे. दंगलखोरांकडून वसुलीसाठी आम्ही केलेली कारवाई हा प्रशासकीय आदेश होता. नंतर आम्ही कायदा केला. तीन न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात आली आहे. तुम्ही प्रशासकीय आदेशाने नव्हे तर न्यायाधिकरणाद्वारे वसुली करू शकता, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता त्यानुसार कारवाई केली जाईल.

कोरोनाच्या वेळी सपा, बसपा आणि काँग्रेसचे नेते कुठे होते?

हिजाबच्या वादाकडे तुम्ही कसे पाहता? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, हे प्रकरण कर्नाटकातून पुढे आले आहे. मला विश्वास आहे की देशाची व्यवस्था संविधानाने चालवली जाईल. वैयक्तिक कायदा किंवा शरियतने नाही. आपण घराच्या आत आपला स्वतःचा पोशाख ठेवू शकता, परंतु कोणत्याही संस्थेत, जेथे ड्रेस कोड आहे. ते लागू झाले पाहिजे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुमच्या सरकारवर अपयश आल्याचा आरोप होतोय, यावर तुमचे काय म्हणणे आहे? या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कोरोनाच्या वेळी सपा, बसपा आणि काँग्रेसचे नेते कुठे होते? त्यावेळी हे सर्व पक्ष गायब होते. होम आयसोलेशनमध्ये होते. फक्त ट्विटरवर सक्रिय होते. आम्ही सर्वांनी चांगली व्यवस्था केली. आपल्या कोरोना व्यवस्थापनाचे देशात आणि जगात कौतुक होत आहे.

त्या दिवशी हे जिनांचा गौरव करत

तुमच्याकडे विकासकामांची मोठी यादी आहे, मग निवडणुकीत जिना आणि दहशतवादाचे मुद्दे येतात? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला फक्त विकासाचा मुद्दा पुढे करायचा आहे. संपूर्ण देश सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत असताना समाजवादी पक्ष त्या दिवशी जिनांचा गौरव करत होता. ज्या दिवशी आम्ही राज्यातील तरुणांना स्मार्ट फोन देत होतो, त्या दिवशी सपा पाकिस्तानचे कौतुक करत होते. हेच जिना आणि पाकिस्तान आणतात, आम्ही नाही. सबका साथ सबका विकास या मुद्द्यासह आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत. या निवडणुकीत भाजपला किती जागा जिंकता येतील? यावर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ऐंशी विरुद्ध वीस असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा - देशाला मिळणार आणखी स्वदेशी कोरोना लस; बायॉलिजिकल कंपनीच्या कॉर्बव्हॅक्सला केंद्राकडून मंजुरी

Last Updated :Feb 22, 2022, 7:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.