ETV Bharat / bharat

CDS Bipin Rawat : भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यामुळे भरायची विरोधी सैन्याच्या उरात धडकी

author img

By

Published : Mar 16, 2023, 12:29 PM IST

CDS Bipin Rawat
भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत

भारतीय सैन्य दलाचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी आपल्या कर्तृत्वाने सैन्य दलाला एका वेगळ्या उंचीवर नेले. भारतीय सैन्याचा जगभरात दरारा निर्माण केला. त्यांच्या या कामगिरीमुळेच भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे. आज बिपीन रावत यांची ६६ वी जयंती आहे, त्यानिमित्त ईटीव्ही भारतने घेतलेला त्यांचा कार्याचा आढावा.

हैदराबाद : भारतीय सैन्याचे पहिले संरक्षण दल प्रमुख असलेल्या जनरल बिपीन रावत यांच्यामुळे विरोधी सैन्याच्या उरात धडकी भरत असे. त्यांच्या नेतृत्वातच भारताने अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यांच्या यशस्वी नियोजनामुळे आणि धाडसी कारवाईचा धसका शेजारील देशानेही घेतला होता. त्यामुळे शत्रू राष्ट्राच्या सैन्याने बिपीन रावत यांचा चांगलाच धसका घेतला होता. भारत मातेच्या या थोर सुपूत्राचा १६ मार्च १९५८ ला जन्म पौरी या उत्तराखंडमधील राज्यात झाला होता.

लष्करी शिस्तीत शिक्षण : बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण रावत हे लष्करात अधिकारी होते. त्यामुळे बिपीन रावत यांचे बालपण आणि शिक्षण लष्करी शिस्तीत झाले. त्यांचा जन्म उत्तराखंडमधील पौरी गावात १६ मार्च १९५८ ला झाला होता. बिपीन रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य अकादमीमध्ये ( National Military Academy ) प्रवेश घेतला. त्यामुळे त्यांना पुन्हा देहराडूनला यावे लागले. त्यानंतर पुढील शिक्षण बिपीन रावत हे अमेरिकेत गेले. अमेरिकेत त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. त्यासोबतच बिपीन रावत यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

बजावली धाडसी कामगिरी : जनरल बिपीन रावत यांनी अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परत आल्यावर सैन्य दलातील नोकरी पत्करली. त्यांनी गोरखा रायफल्सच्या पाचव्या तुकडीत डिसेंबर १९७८ ला आपल्या लष्करी सेवेला सुरूवात केली. बिपीन रावत यांच्या धाडसी कारवायामुळे त्यांना लष्करी जवानांमध्ये मोठा दबदबा निर्माण केला होता. १९८६ च्या दरम्यान बिपीन रावत यांनी चीन सिमेवर प्रत्यक्ष सिमारेषेवर भारतीय लष्कराची धुरा संभाळली. त्यांच्या धाडसी कारवायामुळेच चीनी सैन्यातही त्यांचा दरारा असल्याचे लष्करी जवान स्पष्ट करतात. १९९९ मध्ये पाकिस्तानने आगळीक करत भारताच्या कारगिलवर चाल केली. त्यावेळी सैन्य दलात समन्वय असल्याचा अभाव भारतीय सरकारला वाटला. त्यामुळेच सैन्य दलात समन्वय राखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती करण्याची शिफारस केली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सांभाळली पायदळाची धुरा : लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झाले. '11 गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती. 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा सांभाळली. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी पद निर्माण करण्याची शिफारस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून करण्यात आली होती. ही बाब सरकारच्या विचाराधिन होती.

पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ : भारत सरकारने जनरल बिपीन रावत यांची 31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे बिपीन रावत यांनी आपल्या लष्कर प्रमुख पदानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कार्यभार स्विकारला. यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून कार्यरत होते. 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते कार्यभार पाहत होते. त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे ते कमांडर होते. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचे नेतृत्व देखील जनरल बिपीन रावत यांनी केले आहे. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्वही केले आहे.

सरकारने दिला पद्मविभूषण : जनरल बिपीन रावत यांनी आपल्या कर्तृत्वाने भारत मातेची सेवा केली. त्यांनी डोकलाम सैन्य हल्लानंतर चीनला जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार केला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानलाही सिमेत आलेल्या घुसघोराला परत जाऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या सेवेमुळेच भारत सरकारने त्यांना विविध पुरस्काराने गौरवले होते. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र ८ डिसेंबर २०२१ ला भारत मातेचा हा सुपूत्र हैलिकॉप्टरच्या निलगिरी येथील दुर्दैवी अपघातात शहीद झाला. त्यामुळे सरकारने त्यांच्या सैन्य दलातील सेवेसाठी त्यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. आज जनरल बिपीन रावत यांची 66 जयंती, त्यानिमित्त भारत मातेच्या या सुपूत्राला ईटीव्ही भारतचे अभिवादन.

हेही वाचा - National Vaccination Day 2023 : गोवरमुळे जातो हजारो बालकांचा बळी, अशी घ्या आपल्या चिमुकल्यांची काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.