ETV Bharat / bharat

CBSE Board Exam: सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 15 फेब्रुवारीपासून 10वी, 12वीच्या परीक्षा

author img

By

Published : Dec 29, 2022, 10:55 PM IST

CBSE  board exam
CBSE board exam

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE) गुरुवार शैक्षणिक सत्र 2022-23 साठी दहावी, 12वी बोर्ड परीक्षांचे तारखा जाहीर केल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परिक्षा (CBSE announced date of 10th and 12th board exam) सुरू होणार आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने(CBSE) शैक्षणिक सत्र 2022-23 साठी 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 15 फेब्रुवारी 2023 पासून बोर्डाच्या परिक्षेला सुरवात होणार आहे. CBSE च्या परिक्षा 5 एप्रिल 2023 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहीती बोर्डाने दिली आहे.

CBSE  board exam
सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE परीक्षेची तारीख पत्रक 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी वर्ग 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसई वर्ग १०वी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी, २०२३ ते २१ मार्च २०२३ पर्यंत. 12वी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी, 2023 ते 05 एप्रिल, 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.

यापूर्वी, जेईई मेन, एनईईटी यूजी, सीयूईटी यूजी इत्यादी प्रवेश परीक्षांच्या तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने आधीच जाहीर केल्या होत्या. त्याच वेळी, ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक देखील CISCI द्वारे प्रसिद्ध केले गेले होते. अशा परिस्थितीत सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक प्रलंबीत होते, जे आज जाहीर झाले आहे.

इतर परिक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन तारखा जाहिर - CBSE ने इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षेची तारीख पत्रक 2023 जाहीर करताना सांगितले की, साधारणपणे दोन्ही वर्गांमध्ये, दोन प्रमुख विषयांमधील परीक्षेत पुरेशी अंतर असणार आहे. सीबीएसईने म्हटले आहे की, इयत्ता 10वी, 12वीची तारीखपत्रक सुमारे 40 हजार विषयाचे संयोजन तयार केले आहे. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला एकाच तारखेला दोन विषयांसाठी उपस्थित राहावे लागणार नाही. केंद्रीय बोर्डाने पुढे सांगितले की, इयत्ता 12वीची तारीखपत्रिका तयार करताना, JEE मेन, NEET,CUET UG यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.