ETV Bharat / bharat

"आता महाभारताचं युद्ध पाहा", हकालपट्टीनंतर महुआ मोईत्रा यांची 'ती' प्रतिक्रिया चर्चेत; वाचा काय आहे प्रकरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 7:42 PM IST

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचरण समितीनं लोकसभेत आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यांची संसदेतून हकालपट्टी करण्यात आली.

mahua moitra
महुआ मोईत्रा

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर खासदाराचा 'लॉग इन पासवर्ड' शेअर केल्याचा आरोप होता. या प्रकरणी आज (शुक्रवार, ८ डिसेंबर) लोकसभेत आचरण समितीनं आपला अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांचंं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • #WATCH | TMC MP Mahua Moitra says, "Maa Durga aa gayi hai, ab dekhenge...Jab naash manuj par chhata hai, pehle vivek mar jaata hai. They have started 'vastraharan' and now you will watch 'Mahabharat ka rann'."

    Ethics Panel report on her to be tabled in Lok Sabha today. pic.twitter.com/r28o2ABVbB

    — ANI (@ANI) December 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज आई दुर्गा आली : खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील आचरण समितीचा अहवाल हा ४ डिसेंबरलाच सादर होणार होता. मात्र, विरोधी पक्षांनी सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे संसदेतील चर्चेनंतर शुक्रवारी अहवाल सादर करण्यात आला. संसदेमध्ये दाखल होण्यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला. महुआ म्हणाल्या की, "आज आई दुर्गा आली आहे. जेव्हा नाश जवळ येतो, तेव्हा प्रथम विवेकबुद्धी नष्ट होते. त्यांनी वस्त्रहरण सुरू केलं, आता आपण महाभारतमधील युद्ध पाहणार आहोत".

अहवाल आधीच तयार केला असल्याची टीका : आचरण समितीच्या सहा सदस्यांनी कारवाई करण्याच्या बाजूनं मतदान केलं होते. त्यामध्ये काँग्रेसमधून निलंबित झालेल्या खासदार परणीत कौर यांचाही समावेश आहे. तर समितीमधील विरोधी पक्षांच्या चार सदस्यांनी मोईत्रा यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या विरोधात मतदान केलं. आचरण समितीनं तयार केलेले अहवाल आधीच ठरवून तयार केला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

ममता बॅनर्जींनी पाठिंबा दिला : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची पाठराखण केली आहे. मोईत्रा यांना स्वत:चा बचाव करण्याची परवानगी न दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. "आज भाजपाची वागणूक पाहून मला खूप वाईट वाटत आहे. ४७५ पानांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडे अर्धा तासांचा वेळ होता. महुआ मोईत्राला पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी महुआला स्वतःचा बचाव करू दिला नाही. हा घटनात्मक अधिकारांचा विश्वासघात आहे. तुमच्याकडे विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही एखाद्याला हाकलून देऊ शकत नाही", असा हल्लाबोल ममता बॅनर्जींनी केला. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी महुआ मोईत्रा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा :

  1. खासदार महुआ मोईत्रा यांची संसदेतून हकालपट्टी, विरोधकांचा सभात्याग
  2. इकबाल मिरचीसोबत प्रफुल्ल पटेल यांचे संबंध-नाना पटोले
  3. कर्जाच्या मासिक हप्ताचा व्याजदर राहणार 'जैसे थे’ आरबीआयकडून सलग पाचव्यांदा दिलासा नाही!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.