ETV Bharat / bharat

मोठ्या हल्ल्याच्या तयारीत पाकिस्तान? सीमेवर आढळले भुयार

author img

By

Published : Jan 23, 2021, 7:56 PM IST

भुयार
भुयार

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या पानसरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एक भुयार आढळले आहे. काही दिवसांपूर्वी सीमेवर असाच एक बोगदा आढळून आला होता.

श्रीनगर - प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या पानसरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एक भुयार आढळले आहे. हा बोगदा जवळपास 150 मीटर लांब व 30 फूट खोल आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी हा बोगद्याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती आहे. सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी सीमेवर असाच एक भुयार आढळून आला होता.

भुयारी मार्ग सापडल्यानंतर जम्मूतील इतर ठिकाणांवर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीमेवर अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले आहे. सीमेवर कडक पहारा असल्याने सुरक्षाव्यवस्थेची नजर चुकवून भुयारी मार्गानेच भारतात दहशतवाद्यांना पाठवले जाते. भुयारी मार्गावरील हालचाल नजरेच्या टप्प्यात येत नाहीत.

नोव्हेंबर 2020 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील सांबा जिल्ह्यातून 150 मीटर लांबीचा बोगदा असल्याचं बीएसफला आढळले होते. या बोगद्यातूनच दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याची शंका जम्मू-कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.