ETV Bharat / bharat

भाजपच्या 'ध्रुवीकरण राजकारणा'ने कॉंग्रेसचे नुकसान, ममताला फायदा - अधीर रंजन चौधरी

author img

By

Published : Jun 20, 2021, 10:48 AM IST

अधीर रंजन चौधरी
अधीर रंजन चौधरी

नुकत्याच कोलकातामध्ये झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा करून आल्यावर पश्चिम बंगालचे काँग्रेसाध्यक्ष अधीर रंजन चौधरींनी पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या ध्रुवीकरण राजकारणाने काँग्रेसचे नुकसान झाले असून ममता बँनर्जीला याचा फायदाच झाल्याचे विधान त्यांनी केले.

कोलकता (पश्चिम बंगाल) - भाजपच्या ध्रुवीकरण राजकारणाने काँग्रसचे नुकसान केले आहे. मात्र, यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना निवडणुकींमध्ये विजयी होण्यास फायदा झाला, असे पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालावर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. राजकीय परिस्थिती कॉंग्रेससाठी अनुकूल नव्हती आणि राज्यातील अल्पसंख्यांक समाजाने जातीयवादी शक्ती नष्ट करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसची निवड केली.

या वर्षाच्या सुरुवातीच्या आठ टप्प्यांच्या विधानसभा निवडणुकीत टीएमसी एकूण 294 जागांपैकी २१३ जागांसह विजयी ठरले. भाजपाने 77 जागा मिळवल्या. काँग्रेस, डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ)ना एक जागा मिळवण्यात यश आले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमधील राजकीय परिस्थिती आमच्या बाजूने नव्हती. बीजेपीने आपली सर्व शक्ती एकवटली होती. मात्र, तेथे त्यांना अपयश आले. भाजपच्या ध्रुवीकरण राजकारणाने काँग्रसचे नुकसान केले आहे. मात्र, यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना निवडणुकींमध्ये विजयी होण्यास फायदा झाला. अल्पसंख्यांक लोकसंख्येने जातीयवादी शक्ती नष्ट करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसची निवड केली.

आम्ही मार्ग सोडला नाही

काँग्रेसचे आयएसएफ आणि सीपीएम युतीबद्दल ते म्हणाले, हा विषयाबद्दल आमच्याशी बोलणे झाले नव्हते. आम्ही कधीही आयएसएफशी युती केली नाही. आमची युती भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) बरोबर आहे. आम्ही मार्ग सोडला नाही आणि युती अजूनही आहे. आयएसएफ नेत्यांनी आमच्याविरोधात किंवा युतीच्या विरोधात काहीही विधान केले नाही आणि आम्हीही काही बोललो नाही. युतीमध्ये काही मतभेद झाल्यास, ते समजेल, असेही ते म्हणाले. बंगालमधील कॉंग्रेसचे दिशा आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यवाही याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - देशद्रोह आणि व्यवस्थेविरूद्ध बंड करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.