ETV Bharat / bharat

BJP vs AAP in Delhi : दिल्लीत राजकारण पेटले... भाजप कार्यकर्त्यांची अरविंद केजरीवाल यांच्या घरात तोडफोड; 70 जण ताब्यात

author img

By

Published : Mar 30, 2022, 7:03 PM IST

आक्रमक भाजप कार्यकर्ते
आक्रमक भाजप कार्यकर्ते

उत्तर जिल्ह्याचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाबाहेर ( Delhi CM house attack ) निदर्शने केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास दीडशे ते दोनशे आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ( Protest outside Arvind Kejriwals house ) पोहोचले. काश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या विधानामुळे हे लोक संतप्त होते.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी झालेल्या धरणे आंदोलनादरम्यान त्यांच्या घराची तोडफोड ( attack on delhi CM Arvind Kejriwal house ) करण्यात आली. लोकांनी याठिकाणी घोषणाबाजी केली. तेथे लावलेला सीसीटीव्ही कॅमेराही तोडला. त्यांच्या काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत दिलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे निदर्शने करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.

उत्तर जिल्ह्याचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाबाहेर ( Delhi CM house attack ) निदर्शने केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास दीडशे ते दोनशे आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ( Protest outside Arvind Kejriwals house ) पोहोचले. काश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या विधानामुळे हे लोक संतप्त होते.

बूम बॅरिअरची तोडफोड- काही आंदोलकांनी दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरील बॅरिकेड तोडून आत प्रवेश केला. याठिकाणी त्यांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द बोलले. त्यांच्याकडे पेंट्सचा बॉक्स होता. हा बॉक्स त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दारात फेकून दिला. यावेळी त्यांनी बूम बॅरिअरची तोडफोड केली. तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही नुकसान केले. हा हल्ला झाला तेव्हा मुख्यमंत्री केजरीवाल घरात नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

केजरीवाल यांच्या घरावर निदर्शने- भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते तेजस्वी सूर्या आणि वासू रुखड यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर जोरदार निदर्शने केली, युवा मोर्चाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या गेटवर भगवा रंग लावला. डीसीपी सागर सिंग कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळाबाबत घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी ७० आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतले. इतर सर्व आंदोलकांना येथून हटविण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेबाबत सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत हे. या संपूर्ण घटनेबाबत लवकरच एफआयआर नोंदवला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपला केजरीवालांना मारायचे आहे: मनीष सिसोदिया - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी आज जे काही घडले तो नियोजनबद्ध कट होता. भाजपला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे. पण देश ही घटना सहन करणार नाही. पंजाबमधील भाजपच्या दारुण पराभवाचा हा रोष आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, राजकारण हे निमित्त आहे. भाजपला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे. भाजपच्या गुंडांनी पोलिसांत्या मदतीनेच तोडफोड केली आङे. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला. या संपूर्ण घटनेची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनिष सिसोदिया यांची पत्रकार परिषद

पाप सिसोदिया आणि केजरीवाल यांना घाबरवत आहे- मनजिंदर सिंग सिरसा- भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, मनीष सिसोदिया यांची ही नौटंकी काही पहिलीच वेळ नाही. सिरसा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत केलेले पाप, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या आणि बहिणी-मुलींवर झालेली वागणूक शब्दात वर्णन करता येणार नाही. त्याच्यावर हसणे, टोमणे मारणे आणि विनोद करणे, हे खूप वाईट होते. तेच पाप अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना घाबरवत आहे. त्यांच्या वक्तव्याचा हा परिणाम आहे. आज देशातील जनता अरविंद केजरीवाल यांना विचारत आहे की तुम्ही काश्मिरी पंडितांच्या विरोधात का आहात? बॅरिकेड तोडल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर कसा हल्ला झाला, हे त्यांच्या आकलनापलीकडचे आहे, असे सिरसा म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचे व्हिक्टिम कार्ड

केजरीवाल व्हिक्टिमचे कार्ड खेळत आहेत: भाजप खासदार गौतम गंभीर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा आरोप केला आहे. गौतम गंभीरने ट्विट केले की, 'नमस्ते दिल्ली, काश्मिरी हिंदूंचा अपमान करून मी वाईटरित्या अडकलो आहे. लाखो प्रयत्न आणि विक्रीयोग्य मुलाखती करूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाही. आता एकच मार्ग आहे, व्हिक्टिम कार्ड. भाजपला मला मारायचे आहे. कृपया हे पसरविण्यात मदत करा! तुमचे प्रसिद्धी मंत्री, असे ट्विट करत भाजप खासदार गंभीर यांनी केजरीवाल यांची खिल्ली उडविली आहे.

गौतम गंभीर यांचे ट्विट
गौतम गंभीर यांचे ट्विट

हेही वाचा-30 March Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत सावध राहावे लागेल; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

हेही वाचा-Firozabad Accident : फिरोजाबादमध्ये भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

हेही वाचा-Saint Raped Teenager : आणखी एक बलात्कारी बाबा! परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.