ETV Bharat / bharat

Bharatpur Murder: ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या प्रकरणाला नवं वळण, भावानं भावाची हत्या करण्याचं काय आहे कारण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 9:01 AM IST

भरतपूर जिल्ह्यातील बयाना भागातील अड्डा गावात बुधवारी सकाळी झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी 12 तासांतच हत्या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.

Bharatpur Murder
Bharatpur Murder

भरतपूर(जयपूर)- राजस्थान राज्यात दोन गटांमध्ये शेतामधील रस्त्यावरून वाद होता. अशा स्थितीत दुसऱ्या गटातील व्यक्तीला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी भावानेच भावाची हत्या केली. आरोपीनं मोठ्या भावाचा ट्रॅक्टर खाली चिरडून निर्घृण खून केला. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्याकरिता गावकऱ्यांची चौकशी केली. ताब्यात घेतलेल्या लोकांनी माहिती दिल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की, बयाना येथील पोलीस स्टेशन हद्दीतील अड्डा गावात राहणारे निरपत गुर्जर यांची ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बयाना एएसपी ओमप्रकाश किलानिया, सीओ बयाना, एसएचओ सदर पोलीस स्टेशन, बयाना एसएचओ, रुदवल आणि गढी बजना एसएचओ हे घटनास्थळी पोहोचले.

दोन गटामध्ये सामाईक मार्गावरून वाद सुरू होता. त्यावरून बुधवारी सकाळी दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. बहादूर व जनक यांनी मृताच्या घरी येऊन त्याला मारहाण केली. या भांडणानंतर त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याकरिता दामोदरनं त्याचा मोठा भाऊ निरपत याचा ट्रॅक्टरनं चिरडून निर्घृण खून केला- एएसपी ओमप्रकाश किलानिया

दुसऱ्या गटाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल- पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही गटाच्या 6 जणांना ताब्यात घेतले. दोन्ही गटातील वादात जखमी झालेल्या 12 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर हत्या झालेल्या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. भावाचा खून केल्यानंतर त्याचा भाऊ भाऊ विनोद याने विरुद्ध गटातील जनक, बहादूर, मुनेश, हनुमत आदींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी विरुद्ध गटातील लोकांविरोधात वार करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सोशल मीडिया व्हायरल झाल्यानं पोलिसांकडून पुन्हा तपास- सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आणि लोकांकडे केलेल्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक दामो उर्फ ​​दामोदरला अटक केली. हा मृत निरपतचा लहान भाऊ आहे. पोलिसांनी आरोपी दामोदरला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपीनं ट्रॅक्टरनं चिरडून भावाची हत्या केल्याचे कबूल केले. गुन्हा करण्याकरिता आरोपीने वापरलेला ट्रॅक्टरही पोलिसांनी जप्त केला.

हेही वाचा-

  1. Surat Crime : घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीची सुरत पोलिसांनी काढली समजूत, मुंबईतील कुटुंबाकडे मुलगी परतली सुखरुप
  2. Two Murders In Nagpur : नागपुरात दोघांची हत्या, प्रॉपर्टी डीलरच्या डोक्यात झाडली गोळी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.