ETV Bharat / bharat

मानहानी प्रकरण : राहुल गांधी ११ ऑक्टोबरला अहमदाबादमधील न्यायलयात लावणार हजेरी

author img

By

Published : Oct 10, 2019, 7:35 PM IST

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढच होत आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढच होत आहे. आज राहुल यांनी सुरतमधील न्यायलयात हजेरी लावली होती. तर उद्या त्यांना अहमदाबादमधील न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. राहुल गांधी यांनी नोटबंदीदरम्यान केलेल्या एका वक्तव्यावरून अजय पटेल यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे.


याप्रकरणाची सुनावणी १२ जुलैला झाली होती. त्यावेळी राहुल यांचा अहमदाबाद न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. दरम्यान 11 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. गेल्या हजेरीच्या वेळेस राहुल गांधी यांनी खटला दाखल केल्यामुळे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले होते. 'खटला दाखल केल्यामुळे माझी वैचारिक लढाई जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी मला संधी दिली आहे', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.


काय प्रकरण?
नोटबंदीदरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष अजय पटेल यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. नोटाबंदी दरम्यान राहुल यांनी सहकारी बँकेवर 745 कोटी रूपयांचे काळे धन पांढरे केल्याचा आरोप केला होता, असे अजय यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

Intro:Body:

fdf


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.