ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Sep 25, 2020, 1:16 AM IST

corona india
भारत कोरोना

कोरोनाविषाणूवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गुरुवारी 185 वा दिवस होता. आतार्यंत देशातील एकूण कोरोनाची रुग्णसंख्या 57 लाख 32 हजार 518 वर पोहोचली आहे. त्यात 91 हजार 149 मृतांचा समावेश आहे.

हैदराबाद - मागील सहा दिवसांपासून नविन कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या सख्येत वाढ होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. तर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तरीदेखील भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे. सध्या तो 80.6 टक्के इतका आहे.

India corona
भारतातील कोरोनाची सद्यस्थिती
  • दिल्ली -

कोरोनाची दुसरी लाट राष्ट्रीय राजधानीत शिगेला पोहोचली आहे. तर येत्या काही दिवसांत संक्रमणाची प्रकरणे कमी होतील, असा संकेत तज्ञांनी दिला आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी म्हणाले. तसेच आम आदमी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एका सरकारी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. येत्या काही दिवसांत त्यांनी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. सिसोदिया यांना बुधवारी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना अहवाल आल्यानंतर ते गृहविलगीकरणात होते.

  • महाराष्ट्र -

मुंबई - राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

  • कर्नाटक -

बंगळुरू - काँग्रेस आमदार बी. नारायण राव यांचे गुरुवारी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या बंगळुरुतील एका रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  • उत्तराखंड -

डेहराडून - उत्तराखंड सरकारने पर्यटकांसाठी कोरोनाच्या काळात नियम कमी केले आहेत. पर्यटकांना सूट देण्यात आली आहेत. पर्यटकांसाठीच्या मार्गदर्शक सूचीबाबत मुख्य सचिव ओम प्रकाश म्हणाले, पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी त्यांचा निगेटिव्ह कोरोना अहवाल सोबत ठेवण्याची सक्ती नाही.

  • गुजरात -

गांधीनजर - सुरत महानगरपालिकेने दोन खासगी लॅब्सना क्लोजर नोटिस बजावली आहे. हेमज्योत लॅबोरेटरी आणि तेजस लॅबोरेटरी असे या नोटिस बजावण्यात आलेल्या लॅबोरेटजचीचे नाव आहे. नमुना अहवाल जमा न करता रॅपिड अँटिजेन टेस्टचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य आरोग्य विभागाला खासगी प्रयोगशाळांच्या राज्यव्यापी चौकशी करण्याचे आदेश दिले. बैठकीला उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते.

  • पश्चिम बंगाल -

कोलकाता - राज्यातील प्रत्येक दुर्गा समितीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्येकी 50 हजार रुपये मंजूर केले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली.

कोरोनाच्या या महासंकटामुळे सर्वांसाठी ही कठीण वेळ आहे. यामुळे आम्ही राज्यातील प्रत्येक दुर्गा पुजा समितीला प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच सीईएससी आणि राज्य वीज मंडळ पुजा 50 टक्के सुट देईल, असेही आम्ही ठरवले. त्या दुर्गा पुजा समितीच्या समनव्य मिटिंगमध्ये बोलत होत्या.

दरम्यान, ज्येष्ठ अणुशास्त्रत्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी चेअरमन डॉ. शेखर बासू यांचे गुरूवारी पहाटे चार वाजून 50 मिनिटांच्या सुमारास कोरोनाने निधन झाले. याबाबत राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली. डॉ. बासूंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता.

  • तामिळनाडू -

चेन्नई - डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे आणि लवकरच ते पूर्णपणे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. याबाबत गुरुवारी मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.