ETV Bharat / bharat

राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून मागणार 'न्याय', 15 राज्यांतून 6700 किलोमीटरचा होणार प्रवास

author img

By ANI

Published : Jan 14, 2024, 10:00 AM IST

Bharat Jodo Nyay Yatra : आज दुपारी 12 वाजता मणिपूरच्या खोंगजोम वॉर मेमोरियल इथून राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होणार आहे. 15 राज्यांतून प्रवास केल्यानंतर 20 मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रा
भारत जोडो न्याय यात्रा

इंफाळ (मणिपूर) Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून म्हणजेच 14 जानेवारीपासून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मणिपूरची राजधानी इंफाळ येथून सुरू होणार आहे. ही यात्रा 20 मार्च रोजी पूर्ण होणार आहे. इंफाळमध्ये या यात्रेची तयारी पूर्ण झालीय. हा प्रवास थौबल जिल्ह्यातील खंगजोम इथून सुरू होणार आहे. यादरम्यान राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधणार आहे. तसेच जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. यानंतर राहुल गांधी हे यात्रेच्या शेवटच्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण : काँग्रेसनं दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आज सकाळी 11 वाजता इंफाळला पोहोचणार आहेत. त्यानंतर खोंगजोम वॉर मेमोरियलला भेट देतील. त्यानंतर ठोबळमध्ये सभा होणार असून त्यानंतर राहुल यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवास सुरू होईल. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या भेटीत 'इंडिया' आघाडीतील इतर पक्षांचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'इंडिया' आघाडीतील सर्व नेत्यांना या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.

15 राज्यांतून जाणार 'भारत जोडो न्याय यात्रा' : काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' देशातील एकूण 15 राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेत 110 जिल्हे, 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभेच्या जागा समाविष्ट केल्या जाणार आहे. हा प्रवास एकूण 6713 किलोमीटरचा असेल. ही यात्रा 15 राज्यांमधून जाणार आहे. त्यात मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. या प्रवासाचा समारोप मुंबईत होणार आहे.

  • हा एक वैचारिक प्रवास : गेल्या शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, "ही यात्रा एक वैचारिक लढा आहे. काँग्रेसनं ध्रुवीकरणाचं राजकारण तसंच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध लढा सुरू केली आहे. हा निवडणुकीचा प्रचार नसून राजकीय पक्षाचा वैचारिक प्रवास आहे."

हेही वाचा :

  1. भारत जोडोनंतर आता राहुल गांधींची 'भारत न्याय यात्रा'; कॉंग्रेस फुंकणार लोकसभेचं रणशिंग
  2. राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.