ETV Bharat / bharat

Asia Cup 2022 IND vs PAK भारत-पाक आज महामुकाबला, सामन्याबद्धल जाणून घ्या सर्वकाही

author img

By

Published : Aug 28, 2022, 12:09 PM IST

Updated : Aug 28, 2022, 3:50 PM IST

india vs pakistan
भारत-पाक

2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर भिडत आहेत. यावेळी आशिया चषक 2022 Asia Cup 2022 यूएईमध्ये होत असून, भारत पाकिस्तान सामना India vs Pakistan दुबई स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

दुबई आशिया चषक 2022 Asia Cup 2022 या स्पर्धेला शनिवार पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघात होणार आहे. रविवारी म्हणजेच आज दुबई स्टेडियमवर दोन्ही देशांचे संघ आमनेसामने असतील. आज जेव्हा संध्याकाली साडेसातला क्रिकेटचा सामना सुरू होईल तेव्हा उन्हाळ्यात दुबईतील वातावरण वेगळेच रंग दाखवेल. मात्र, सोशल मीडियावर भारत-पाक India vs Pakistan Cricket Match सामन्याबाबत सट्टा लावला जात आहे. एकदा खेळ पुन्हा सुरू झाला की, भारत-पाकिस्तान संघर्षाचा उत्साह चाहत्यांना अधिकच गुंतवून ठेवेल.

आशिया चषकात 14 वेळा भारत-पाकिस्तान IND vs PAK आमनेसामने

भारत-पाकिस्तान आतापर्यंत आशिया चषकात 14 वेळा आमनेसामने 14 times India Pak meet in Asia Cup आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 8 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील 1 सामना अनिर्णीत राहिला आहे. तसेच आशिया चषकावर नाव कोरण्यात देखील भारतीय संघ पुढे आहे. आतापर्यंत भारताने 7 वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने दोनवेळा आशिया चषक जिंकला आहे. त्याचबरोबर श्रीलंका संघाने 5 वेळा आशिया चषक पटकावला आहे.

दोन्ही संघांना या खेळाडूंची भासणार उणीव

दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी Bowler Shaheen Shah Afridi या सामन्यात सहभागी होणार नाहीत. जसप्रीत बुमराह Bowler Jasprit Bumrah पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे, तर शाहीन शाह उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याची अनुपस्थिती पाकिस्तानसाठी एक मोठी कमतरता असेल. 2021 च्या T20 विश्वचषकात 10 विकेटने जिंकलेल्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. त्याने चार षटकांमध्ये 3-31 अशी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद केली होती.

बुमराहच्या अनुपस्थितीत या खेळाडूंना संधी

बुमराहच्या अनुपस्थितीत, अर्शदीप सिंग आणि आवेश खान Arshdeep Singh and Avesh Khan यांना भारताच्या T20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांचे स्थान मजबूत करण्याची संधी देण्यात आली आहे. या सामन्यात क्रिकेट दिग्गजांच्या नजरा विराट कोहलीवरही असतील, कारण कोहली बराच काळ फॉर्ममध्ये नाही आणि हा त्याचा 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. माजी कर्णधाराने 2019 पासून एकही शतक झळकावलेले नाही आणि या वर्षी फक्त चार T20 खेळले आहेत. आज दीड महिन्यानंतर कोहली क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मावर Captain Rohit Sharma देखील लक्ष्य असणार आहे.

त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतचा धडाका आणि शेवटच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकचा कारनामा यामधील निर्णय घ्यावा लागेल. पाकिस्तानची फलंदाजी कशी टिकून राहते हे पाहणे रंजक ठरेल. अलीकडेच त्यांचे अव्वल तीन खेळाडू कर्णधार बाबर आझम Captain Babar Azam, यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि फखर जमान हे त्यांच्या फॉर्ममध्ये अव्वल आहेत. मधल्या फळीत शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांच्या अनुपस्थितीमुळे, अंतिम टचचे रूपांतर योग्य धावसंख्येमध्ये करणे हे आसिफ अली, इफ्तिखार अहमद आणि युवा हैदर अली यांच्यावर अवलंबून असेल.

आशिया कपसाठी दोन्ही संघ

भारत रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

पाकिस्तान बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर.

सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

हेही वााचा -Ind vs Pak Asia Cup Records 8 सामन्यात हे उदयोन्मुख खेळाडू ठरले विजयाचे नायक, जाणून घ्या भारत पाक सामन्यांचा इतिहास

Last Updated :Aug 28, 2022, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.