ETV Bharat / bharat

Arvind Kejriwal ED Investigation: अरविंद केजरीवाल ईडीच्या नोटीसला उत्तर, चौकशी सोडून मध्य प्रदेशचा करणार दौरा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 10:30 AM IST

Updated : Nov 2, 2023, 11:30 AM IST

Arvind Kejriwal ED Investigation
Arvind Kejriwal ED Investigation

ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी आज बोलाविलं. ईडीच्या नोटीसनुसार आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमधील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. ईडी कार्यालयात हजर राहण्याकरिता केजरीवाल वेळ मागू शकतात, अशी चर्चा आहे.

नवी दिल्ली - मद्यशुल्क धोरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित राहण्यासाठी ईडीनं ३० ऑक्टोबरला नोटीस पाठविली होती. या नोटीसनंतर आम आदमी पक्षाकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या नोटीसला उत्तर दिलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीला दिलेल्या उत्तरात म्हटलं की, आपचा राष्ट्रीय संयोजक आणि स्टार प्रचारक या नात्यानं प्रचारासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवास करणं आवश्यक आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून शासन आणि अधिकृत वचनबद्धता आहे. विशेषत: आगामी दिवाळी पाहता माझी उपस्थिती आवश्यक आहे. ईडीनं पाठविलेलं समन्स हे अस्पष्ट आणि कायद्याच्या दृष्टीनं टिकणार नाही, असंही केजरीवाल यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटलं.

  • Delhi CM Arvind Kejriwal responds to ED, "...Being the National Convener and a star campaigner of the AAP, I am required to travel for campaigning and to provide political guidance to my field workers of AAP. As the CM of Delhi, I have governance and official commitments for… pic.twitter.com/piPS5D5kMB

    — ANI (@ANI) November 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आम आदमी पक्षाला संपविण्याचा प्रयत्न- आपचे नेता व मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी, राघव चढ्ढा व गोपाल राय यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर टीका केली. एकही कार्यकर्ता झुकणार नाही व घाबरणार नाही, अशी ठाम भूमिका आपच्या नेत्यांनी घेतली आहे. भाजपाकडून आम आदमी पक्षाला संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा या नेत्यांनी आरोप केला. मात्र, आम आदमी पक्षाचे संयोजक व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्स आणि मद्यशुल्क धोरण घोटाळ्याबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचं टाळल्याचं दिसून आले.

१०० कोटींची लाच घेतल्याचा आरोप- सीबीआयनं एप्रिल महिन्यात मद्यशुल्क धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलाविलं होतं. तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय मुख्यालयात जाण्यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. एक वर्षापासून ईडीकडून मद्यशुल्क धोरणाचा तपास सुरू आहे. घोटाळ्याबाबत ईडीला अद्याप पैसे व पुरावे आढळून आले नाहीत. मात्र, आप नेत्यांनी १०० कोटी लाच घेतल्याचा ईडीकडून आरोप करण्यात आला आहे. त्याबाबत ईडीनं गोव्यात जाऊन तपास करूनही काहीही हाती लागले नाही.

आपच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह- दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मद्यशुल्क धोरण घोटाळ्यातील आरोपावरून १० महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्याचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. ३३८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप असल्याचा दावा तपास संस्थांनी केला. आपचे नेते संजय सिंह हेदेखील एका महिन्यापासून तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. आपचे नेते यापूर्वीच तुरुंगात असल्यानं आप पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

जंतरमंतर येथं भाजपा करणार आंदोलन- भाजपा नेत्यांकडून आज जंतरमंतर येथे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. या निर्दशनात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधूडी आणि इतर भाजपा नेते सहभाग घेणार आहेत. भाजपा नेत्यांकडून आज जंतरमंतर येथे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. या निर्दशनात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधूडी आणि इतर भाजपा नेते सहभाग घेणार आहेत. वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काम केले नाही तर त्यांना घाबरण्याची गरज नाही.

हेही वाचा-

  1. Delhi Liquor Scam : अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस, 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले
  2. Delhi excise policy scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज
Last Updated :Nov 2, 2023, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.