ETV Bharat / bharat

Raosaheb Danve : कुणीही काही म्हटले तरी आमचे मनोमिलन झाले- रावसाहेब दानवे

author img

By

Published : Jul 26, 2022, 11:52 AM IST

Updated : Jul 26, 2022, 12:39 PM IST

दिल्लीत भेट
दिल्लीत भेट

Raosaheb Danve : राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

नवी दिल्ली- राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, की, राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

जालनामध्ये शिवसेनेला भगदाड - शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्याने खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. मात्र, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी जाहीर प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

भेटीदरम्यान रावसाहेब दानवेंनी केले स्वागत : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचे शिंदे गटात स्वागत केले आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जाणार आहे.

अर्जुन खोतकर यांच्यावर नुकतीच झाली होती ईडीची कारवाई : अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीने फास कसला असून, कारखान्याची मालमत्ता, जमीन यंत्रसामग्री सील केली आहे. त्यामुळेच खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. तरीही अजून माजी मंत्री अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत का नाही याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

नुकतीच उपनेतेपदी अर्जुन खोतकरांची झाली होती नियुक्ती : एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी खांदापालट करायला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी अर्जुन खोतकर ( Arjun khotkar as shiv sena deputy leader ) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर पक्ष कारवाया केल्याप्रकरणी विजय नाहटा, विजय चौगुले या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ( Shiv Sena Central Office ) देण्यात आली.

हेही वाचा - Breaking अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे

Last Updated :Jul 26, 2022, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.