ETV Bharat / bharat

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात; दोन ट्रेनची टक्कर; 8 प्रवाशांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 10:27 PM IST

Updated : Oct 29, 2023, 11:00 PM IST

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये दोन रेल्वे गाड्यांमध्ये टक्कर झाली. पॅसेंजर ट्रेन उभी असतानाच हा अपघात झालाय. या धडकेत पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या दुर्घटनेत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 18 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Andhra Train Accident
Andhra Train Accident

हैदराबाद Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, रेल्वे प्रशासनानं याला दुजोरा दिलेला नाही. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला पाठीमागून धडकली. विजयनगरम जिल्ह्यातील अलमांडा-कांकटपल्ली दरम्यान हा अपघात झाला. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे.

  • #WATCH | Andhra Pradesh train accident | Visuals of rescue operations

    6 people died and 18 injured in the Andhra Pradesh train accident: Deepika, SP, Vizianagaram pic.twitter.com/5iHHzI1UWQ

    — ANI (@ANI) October 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या अपघातात पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन, एनडीआरएफला देण्यात आली आहे. अपघात निवारण गाडीही घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे - विभागीय रेल्वे व्यवस्थापक

" class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पॅसेंजर ट्रेनला पाठीमागून धडक : दक्षिण कोस्ट रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ट्रेन 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर, 08504 विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरला धडकली, यात तीन डबे रुळावरून घसरले. मदतकार्य चालू आहे. वॉलटेअर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी सांगितलं की, बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफला मदतीसाठी सूचित केलं आहे. अपघात निवारक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं की, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मदत कार्यासाठी सर्व व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. रुग्णवाहिका, इतर जीवनावश्यक वस्तू घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

  • PMO tweets, "PM Narendra Modi spoke to Railway Minister Ashwini Vaishnaw and took stock of the situation in the wake of the unfortunate train derailment between Alamanda and Kantakapalle section. Authorities are providing all possible assistance to those affected. The Prime… pic.twitter.com/Kd5dRR0KQO

    — ANI (@ANI) October 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आंध्र प्रदेशातील विजयानगरम जिल्ह्याजवळ एका पॅसेंजर ट्रेनची दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला टक्कर झाल्याने अपघात झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. बचावकार्य सुरू आहे, सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे - अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 2 गाड्यांची टक्कर झाल्याची माहिती ऐकून खूप दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि भविष्यात असे अपघात होणार नाहीत याची काळजी - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

ट्रेन ओव्हरहेड केबल कट : विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन ओव्हरहेड केबल कट झाल्यामुळं उभी होती. त्याचवेळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन त्याच रुळावर मागून येऊन धडकली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या धडकेत बोगीचं मोठं नुकसान झालंय.

रेल्वे हेल्पलाइन क्रमांक जारी : अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आलाय. खाली दिलेल्या नंबरवर डायल करून घटनेशी संबंधित माहिती मिळवता येईल.

रेल्वे क्रमांक : 83003, 83004, 83005, 83006

बीएसएनएल लँड लाईन क्रमांक- 08912746330; 08912744619

एअरटेल: 8106053051, 8106053052

BSNL: 8500041670, 8500041671

हेही वाचा -

  1. Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ
  2. Fire Breaks in Pathankot Express : 'त्या' रेल्वे कर्मचाऱ्यामुळे पठाणकोट एक्सप्रेसमधील आगीची मोठी दुर्घटना टळली, जाणून घ्या सविस्तर
  3. Ahmednagar Railway Fire : अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेच्या ५ डब्यांना भीषण आग, सर्व प्रवासी सुखरूप
Last Updated :Oct 29, 2023, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.