Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 10:22 PM IST

thumbnail

बुलढाणा Ahmedabad Howrah Express : जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकावर (Nandura Railway Station) बुधवारी हावडा अहमदाबाद एक्सप्रेसवर तुफान दगडफेक (Stone Threw On  Howrah Express) झाल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या दगडफेकीत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दहा ते पंधरा जणांनी रेल्वेच्या एसी बोगीवर ही दगडफेक केली. पॅन्ट्री कारमध्ये बसण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत दहा ते पंधरा जणांविरुद्ध रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रेल्वेवर दहा ते पंधरा जणांकडून दगडफेक करण्यात येते याची माहिती, रेल्वे पोलीस प्रशासनाकडून बराच वेळ माध्यमांपासून लपवण्यात आल्याने, संशयाला जागा निर्माण होत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची पृष्टी 'ईटीव्ही भारत' करत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.