ETV Bharat / bharat

महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचे वाढले गुढ; आरोपींना कठोर शिक्षा करण्याची आनंद गिरींची मागणी

author img

By

Published : Sep 20, 2021, 10:27 PM IST

आनंद गिरी
आनंद गिरी

महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आनंद गिरी यांचे नाव आहे. त्याबाबत बोलताना आनंद गिरी म्हणाले, की मला काहीही माहित नाही. गुरुजी यांनी जीवनात कधीही पत्र लिहिले नाही.

लखनौ - प्रयागराजमधील बाघंबरी मठात सोमवारी महंत नरेंद्र गिरी यांचा सशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मोठे गुढ निर्माण झाले आहे. त्यांचा मृतदेह हा दोरीला लटकलेल्या स्थितीत आढळला होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आनंद गिरी यांच्यासहित काही शिष्यांची नावे लिहिली आहेत. आनंद गिरी यांनी आपण निष्पाप आहोत, असा दावा करत पत्राच्या सत्यतेची चौकशीची मागणी केली आहे.

आनंद गिरी म्हणाले, की हे मोठे षड्यंत्र आहे. गुरू आणि शिष्यामध्ये कोणताही वाद राहिलेला नव्हता. जे लोक मठ आणि मंदिरातील पैसा त्यांच्या घरापर्यंत नेत होते, त्यांचा हा डाव आहे. ज्यांचे 2 हजार रुपयेही उत्पन्न नव्हते, त्यांचे 5 कोटी व 10 कोटी रुपयांचे घरे झाली आहेत. नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करून अनेकांनी पैसे कमविले आहेत. त्यांचाच हा डाव आहे. त्या डावातूनच महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली आहे. त्यांच्या हत्याप्रकरणात जाणूबुजून माझे नाव गोवले आहे. हे षड्यंत्र आहे. या प्रकरणात पोलिसांमधील मोठे अधिकारी आणि मठामधील काही शिष्यांचाही सहभाग असू शकतो.

आनंद गिरींनी निष्पाप असल्याचा केला दावा

हेही वाचा-राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

गुरुजी आत्महत्या करणार नाहीत, हा विश्वास

महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आनंद गिरी यांचे नाव आहे. त्याबाबत बोलताना आनंद गिरी म्हणाले, की मला काहीही माहित नाही. गुरुजी यांनी जीवनात कधीही पत्र लिहिले नाही. जे पत्र मिळाले आहे, त्याची तपासणी व्हावी. गुरुजी आत्महत्या करणार नाहीत, हा मला पूर्ण विश्वास आहे. त्यांची हत्या करण्यात आली आहे.

हेही वाचा-अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी

महंतांच्या हत्येमागी अजय सिंह सिपाही, मनीष शुक्ला, अभिषेक मिश्रा, शिवेक मिश्रा यांचा समावेश असू शकतो, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हे लोक नेहमीच गुरुजींकडे पैसे मागत होते. आनंद गिरी म्हणाले, की मठाची निर्मिती करण्यासाठी मी संपूर्ण आयुष्य अर्पण केले आहे. त्याचेच आज फळ मिळाले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आनंद गिरी यांनी केली आहे.

हेही वाचा-आजपासून नवीन धडा शिकला... उमा भारतींकडून असंयमी भाषेबद्दल माफी

दरम्यान, प्रयागराजमधील बाघंबरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार महंतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. महंत यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. महंतांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस हे मठामधील लोकांची चौकशी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.