ETV Bharat / bharat

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

author img

By

Published : Sep 20, 2021, 7:12 PM IST

Updated : Sep 20, 2021, 7:28 PM IST

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूबाबत संशयास्पद स्थिती आहे. पोलिसांकडून मठामधील लोकांची चौकशी सुरू आहे.

महंत नरेंद्र गिरी
महंत नरेंद्र गिरी

लखनौ - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज जिल्ह्यात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मठामधील लोकांची चौकशी सुरू आहे.

प्रयागराजमधील बाघंबरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार महंतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. महंत यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. महंतांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस मठामधील लोकांची चौकशी करत आहेत.

  • अखिल भारतीय अखाड़ा परिषद के अध्यक्ष पूज्य नरेंद्र गिरी जी का निधन, अपूरणीय क्षति!

    ईश्वर पुण्य आत्मा को अपने श्री चरणों में स्थान व उनके अनुयायियों को यह दुख सहने की शक्ति प्रदान करें।

    भावभीनी श्रद्धांजलि। pic.twitter.com/wD2JC14LDp

    — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-उमा भारती बरळल्या, म्हणाल्या नोकरशाहीची काही औकात नाही, नेत्यांची चप्पल उचलते

राम मंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका पार पाडणारे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी महंत गिरी यांचा मृत्यू हा कट असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा-२०२२ ला गोव्यात भाजपला मिळणार ऐतिहासिक विजय, फडणवीसांचा दावा

अखिलेश यादव यांनी व्यक्त केला शोक-

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. हा मृत्यू म्हणजे कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. याबाबत अखिलेश यादव यांनी ट्विटही केले आहे.

दरम्यान, महंत नरेंद्र गिरी हे जून 2021 मध्ये एका गंभीर वाहन अपघातामधून वाचले होते. हा अपघात एका स्कूट चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला होता. महंत गिरी यांनी लव्ह जिहाद विरोधात कठोर कारवाई करण्याची व लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी उत्तर प्रदेश सरकारकडे लावून धरली होती. महाराष्ट्रातील पालघर साधू हत्याकांडानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणारे निवदेन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिले होते.

हेही वाचा-राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

Last Updated :Sep 20, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.