महाराष्ट्र

maharashtra

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 20 हजार वह्यांच्या माध्यमातून भव्य प्रतिमा; पाहा व्हिडिओ - Dr Ambedkar Image Beed

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 7:01 PM IST

बीड Ambedkar Jayanti 2024 : भीमज्योती जन्मोत्सवात समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली तसंच गेवराईचे सुप्रसिद्ध चित्रकार उद्देश पघळ यांच्या संकल्पनेतून तब्बल 20 हजार वह्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली. प्रतिमेचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, रा.काँ.पा. ओ.बी.सी.सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेवराई शहरातील र. भ. अट्टल महाविद्यालय मैदानावर करण्यात आले. ही भव्य प्रतिमा पाहण्यासाठी गेवराईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे 20 हजार वह्यांपासून साकारलेली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिकृती मुख्य आकर्षण ठरली आहे. 80X100 साईजमध्ये 8 हजार स्क्वेअर फुटामध्ये ही प्रतिमा आहे, अशी माहिती उद्देश पघळ यांनी दिली. या प्रतिमेचं वर्ल्ड रेकॉर्ड होणार असल्याचं रणवीर पंडित यांनी यावेळी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details