महाराष्ट्र

maharashtra

Satara : साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं काम बंद पाडलं; नेमकं कारण काय?

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 10:25 PM IST

Satara News : साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम अज्ञातांकडून मंगळवारी (19 मार्च) बंद पाडण्यात आलंय. तसंच ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी बांधकाम स्थळावरून पलायन केल्यामुळं साताऱ्यात खळबळ उडाली आहे. परंतु, यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Satara Medical College Construction was stopped employees and contractor fled construction Site What is the reason behind that
सातारा मेडिकल कॉलेज

सातारा Satara News : गेल्या महिनाभरापासून गतीनं सुरू असलेलं साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम (Medical College Construction) मंगळवारी (19 मार्च) अचानक बंद पाडण्यात आलं. तसंच ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी बांधकाम स्थळावरून पलायन केलं आहे. यासंदर्भात दिवसभरात कोणीही तक्रार न दिल्यानं प्रशासनही मूग गिळून गप्प आहे. या घटनेची सध्या साताऱ्यात उलटसुलट चर्चा आहे.



काम बंद ठेवायला कार्यकर्त्यांनी भाग पाडले? : साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून या कॉलेजचं बांधकाम गतीनं सुरु असताना आज सकाळी अचानक काम बंद झालं. साताऱ्यातील नेत्याच्या कृष्णानगरमधील स्थानिक समर्थकांनी काम बंद ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकावलं असल्याची चर्चा आहे. यामुळं साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.



ठेकेदारासह मजुरांचं पलायन : काम बंद ठेवून ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार केली नव्हती. कॉलेजचे डीन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून काम बंद असल्याचा रिपोर्ट ठेकेदारानं अद्याप दिला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, मोबाईल बंद ठेवून ठेकेदारही गायब झाला आहे. यामुळं आता प्रशासन काय भूमिका घेतंय, याकडं सातारकरांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा -

  1. Modi Language : छत्रपती शिवरायांमुळे प्रचारात आली मोडी लिपी; जिल्हा परिषद शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिकून रचला इतिहास
  2. महाबळेश्वरमध्ये अनाधिकृत बांधकामांवर हातोडा, तीन अनाधिकृत बांधकामं जमीनदोस्त
  3. साताऱ्यातील उमेदवारीचा तिढा सुटणार; शरद पवार गटातील दोन इच्छुक नेते एकाच हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details