महाराष्ट्र

maharashtra

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंतिम संस्कार

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 6:33 PM IST

Manohar Joshi Funeral: माजी लोकसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सकाळी निधन झालं.

Manohar Joshi Funeral
Manohar Joshi Funeral

पोलिसांनी दिली मानवंदना

मुंबईManohar Joshi Funeral :माजी लोकसभा अध्यक्ष तथा शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यांनी मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्यावर आज मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी 40 वर्षांहून अधिक शिवसेना पक्षासाठी काम केलं होतं.

शासकीय इतमामात मानवंदना :माजी लोकसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पार्थिव इमारतीतून खाली आणल्यानंतर त्यांना पोलिसांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. यावेळी मनोहर जोशी यांचे पार्थिवावर तिरंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रा शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत पोहोचली.

मनोहर जोशी अमर रहेच्या घोषणा :मनोहर जोशी यांच्यावर शासकीय मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या दादर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. या अंतयात्रेत शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी शिवसौनिकांनी अमर रहे, अमर रहे, मनोहर जोशी अमर रहेच्या जोरदार घोषणा दिल्या.



अनेकांनी वाहिली श्रद्धांजली : मनोहर जोशी यांचं पार्थिव पहिल्यांदा दादर येथील शाखेत ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचं पार्थिव शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलं. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातातील अनेक नेत्यांनी मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राजकारणात मोठी पोकळी :मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भिक्षुक म्हणून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास लोकसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचला होता. पण राजकारण करण्यापेक्षा उद्योजक होण्याचं मनोहर जोशींचं स्वप्न होतं. मराठी माणसांनी व्यवसाय करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळंच त्यांनी मुंबई महापालिकेतील लिपिकाची नोकरी सोडून दादरमध्ये कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती.

हे वाचलंत का :

  1. मनोहर जोशींच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
  2. गाव तिथं 'कोहिनूर' स्थापन्याचं मनोहर जोशींचं होतं ध्येय; चार विद्यार्थ्यांपासून झाली होती सुरुवात
  3. भिक्षुकी ते लोकसभा अध्यक्ष; मनोहर जोशींची थक्क करणारी 'संघर्षगाथा'

ABOUT THE AUTHOR

...view details