महाराष्ट्र

maharashtra

भाऊ-बहीण एकाच मंचावर; अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना मारला टोला

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 6:37 PM IST

Political Leaders Same Stage : पुण्यातील वारजे परिसरातील म्युनिसिपल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पुन्हा एकदा सुप्रिया सुळे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती होती.

Ajit Pawar
Ajit Pawar

सुप्रिया सुळे, अजित पवार यांचं भाषण

पुणे Political Leaders Same Stage :पुण्यात आज महापालिकेच्या मल्टीस्पेशालिस्ट हिलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसले. यावेळी व्यासपीठावरून अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना भाषणात टोला लगावला. तसंच दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळलं.

सर्वोच्च न्यायालयामुळं निवडणुका रखडल्या : नगरसेवकांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी व्यासपीठावरून सरकारकडं केली. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "निवडणुका सरकारमुळं नाही, तर सर्वोच्च न्यायालयामुळं रखडल्या आहेत. निवडणुका घेणे, ही महायुतीची भूमिका आहे."

निवडणुका व्हाव्यात, सरकारची भूमिका : नगरपरिषदांच्या निवडणुका थांबून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयानं रोखल्या आहेत. आम्हीही जनतेनं निवडून दिलेले कार्यकर्ते आहोत. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. पण, सर्वोच्च न्यायालयानं अद्याप ओबीसींच्या मुद्द्यावर निर्णय दिलेला नाही. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, अशी महायुती सरकारची भूमिका असल्याचं अजित पवार म्हणाले.

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन :आज पुण्यातील वारजे परिसरातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. पुण्यातील वारजे माळवाडी येथील पुणे म्युनिसिपल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजनात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकाच मंचावर उपस्थिती होती. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आज पुण्यात विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. त्यामुळं सुळे विरुद्ध पवार असं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

रुग्णालय बांधण्यासाठी 350 कोटी : पुण्यातील महापालिका रुग्णालयाच्या भूमिपूजनप्रसंगी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर असल्याचं दिसून आलं. वारजे परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे रुग्णालय बांधण्यासाठी 350 कोटी रुपये खर्च आला आहे. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता, मात्र तरीही खासगी तत्त्वावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा हा प्रकल्प महापालिकेनं पुढे नेला आहे. महापालिकेच्या जागेवर खासगी एजन्सीच्या माध्यमातून हे रुग्णालय येथे उभारले आहे.

हे वाचलंत का :

  1. सध्या राज्यात नाट्यगृहाबाहेरील नाटकांची चर्चा अधिक-देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
  2. "शिंदे-पवारांना प्रत्येकी साडे सहा जागा मिळणार", महायुतीतील जागावाटपावरुन चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य
  3. "मुंबई मेट्रो, BKC, वांद्रे-वरळी सी लिंकसह अनेक कामं...."; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details