महाराष्ट्र

maharashtra

सदनिकेचं नाव चक्क 'डान्सिंग कार'! काय आहे या नावा मागचं कारण? - Dancing Car Residential

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 10:22 PM IST

Dancing Car Residential : अमरावती शहरात श्री कॉलनी परिसरात अमरावती महापालिकेची अधिकृत परवानगी घेऊन सदनिका उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आमिर खानच्या (Aamir Khan) पिके सिनेमातून प्रसिद्ध झालेला 'डान्सिंग कार' हाच शब्द या (Dancing Car Projects) सदनिकेला नाव म्हणून देण्यात आला आहे. यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Dancing Car Residential
डान्सिंग कार सदनिका

अमरावती शहरात डान्सिंग कार सदनिका

अमरावती Dancing Car Residential: अमरावती शहरातील दस्तूर नगर परिसरात असणाऱ्या श्री कॉलनी परिसरात 'डान्सिंग कार' या नावानं सदनिका उभारली जात आहे. डान्सिंग कार या नावानं इमारतीचं बांधकाम सुरू असल्यामुळं याबाबत आश्चर्यकारक चर्चा रंगायला लागलीय. सदनिकेचं नाव नेमकं 'डान्सिंग कार' (Dancing Car Projects) का ठेवण्यात आलं, या संदर्भात ही सदनिका उभारणारे बिल्डर सचिन रोडे यांच्याशी' ईटीव्ही भारत'ने संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात धक्कादायक अशी माहिती दिली.

परग्रहात पोहोचल्याचा अनुभव :आपलं अमरावती शहर हे अतिशय छोटेसे शहर आहे. या ठिकाणी श्री कॉलनी परिसरात अमरावती महापालिकेची अधिकृत परवानगी घेऊन सदनिका उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामाला सुरुवात होताच चक्क सुट्टीच्या दिवशी महापालिका प्रशासनानं काम थांबवलं. हे काम होऊ देऊ नका यासंदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आदेशाचे पत्र काढल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. आपलं हे छोटेसे काम थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळं ओळखण्यात आल्यामुळं काही वेळासाठी आपण स्वप्नात तर नाही किंवा पीके सिनेमात आमिर खान ज्याप्रमाणं त्याचा ग्रह सोडून वेगळ्या ग्रहावर पोहोचल्यावर त्याला त्याच्या दृष्टीनं आश्चर्यकारक अनुभव आले, तसाच काहीसा धक्का आम्हाला बसला. हा प्रकार आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असून आमिर खानच्या पिके सिनेमातून प्रसिद्ध झालेला 'डान्सिंग कार' हाच शब्द आम्ही आमच्या या प्रकल्पाला देण्याचं ठरवलं, असं सचिन रोडे यांनी सांगितलं.


आदेशाला ठरवलं होतं बेकायदेशीर: श्री कॉलनी परिसरात भूखंड मालक मुकुंद बर्गी आणि विकास सचिन रोडे यांनी एकूण 17 सदनिकेच्या प्रकल्पाला सुरुवात केली असताना, भाजपाच्या महिला प्रदेश पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं हे काम थांबवण्यासाठी सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या लेटरहेडवर अमरावती महापालिकेला सदर काम थांबवण्याचे आदेश दिले होते. आपल्या छोट्याशा कामात थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यामुळं मुकुंद बर्गी आणि सचिन रोडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानं या प्रकरणात निर्णय देताना मुख्यमंत्र्यांना वैद बांधकाम अवैध ठरवून थांबवण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.


इमारतीच्या टोकावर राहणार कारची प्रतिकृती: या प्रकल्पासाठी अनेक महिने आम्हाला जो काही त्रास झाला तो सारा विनाकारण होता. हा प्रकल्प जणू काही आपण एखाद्या वेगळ्या ग्रहावर राबवतो आहे, असं या दरम्यान वाटले. या साऱ्या गोड तिखट अनुभवाची आठवण म्हणून एकूण सतरा सदनिका असणाऱ्या ह्या इमारतीच्या टोकावर डान्सिंग कारची प्रतिकृती देखील तयार केली जाणार असल्याचं सचिन रोडे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. धारावीकरांना मिळणार साडेतीनशे चौरस फुटांची घरं; स्वतंत्र शौचालय आणि स्वयंपाकघर असणार
  2. बीडीडीवासीयांचं पार्किंग तळ्यात मळ्यात; रहिवाशांनी दिला आंदोलनाचा इशारा
  3. MHADA Flat Lottery In Pune: म्हाडाकडून एकूण 6058 सदनिकांची ऑनलाईन सोडत; अनेकांना लागली घरांची लॉटरी

ABOUT THE AUTHOR

...view details