MHADA Flat Lottery In Pune: म्हाडाकडून एकूण 6058 सदनिकांची ऑनलाईन सोडत; अनेकांना लागली घरांची लॉटरी

author img

By

Published : Mar 20, 2023, 8:19 PM IST

MHADA Flat Lottery In Pune

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाकडून आज (सोमवारी) एकूण 6058 सदनिकांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यासाठी एकूण 58 हजार 307 जणांनी अर्ज केला होता. आज काढण्यात आलेल्या या ऑनलाईन सोडतमध्ये अनेकांना घरांची लॉटरी लागल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. लवकरच आपण हक्काच्या घरात जाणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

म्हाडांच्या घरांविषयी प्रतिक्रिया देताना पदाधिकारी आणि विजेते

पुणे: ऑनलाईन सोडतीसाठी ३१२० सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य २९३८ सदनिका एकूण ६०५८ सदनिकासाठी पुणे मंडळातर्फे वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यांतर्गत २९३८ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २४८३ सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६३७ सदनिका अशा एकूण ६०५८ सदनिकांची ऑनलाइन सोडत आज पुणे मंडळात काढण्यात आली. सदनिकांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे काढण्यात आली. यासाठी एकूण 58 हजार 307 जणांनी अर्ज केला होता.

MHADA Flat Lottery In Pune
म्हाडाच्या पदाधिकाऱ्यांकडून सदनिका विजेत्यांचे अभिनंदन

पुणे मंडळात ही 11वी सोडत: याबाबत म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर म्हणाले की, 6 हजार 58 घरांसाठी ही सोडत देण्यात आली होती. यातील 3 हजार 120 घरांची सोडत आज काढण्यात आली आहे. बाकीचे जे 2900 सोडत होती त्यातील 'फस्ट कम फस्ट' या तत्त्वावर ते देण्यात आले आहेत. पुणे मंडळात ही 11वी सोडत होती. आज ज्यांना घरे लागली आहेत त्यांना सायंकाळी सहा वाजता मेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. ज्यांना घर मिळाली आहेत त्यांनी आठ दिवसात प्रक्रिया करून द्यावी. नवव्या दिवशी त्या पूर्ण न झाल्यास त्या रद्द करण्यात येतील, असे देखील यावेळी ठाकूर म्हणाले. मी पहिल्यांदाच म्हाडाचा अर्ज भरला होता आणि मला पहिल्याच प्रयत्नातच घर लागल्याने खूप आनंद होत आहे. ते ही मला नांदेड सिटी येथे घर लागले असल्याचे यावेळी एका लॉटरीत घर लागलेल्या व्यक्तीने सांगितले आहे.

MHADA Flat Lottery In Pune
म्हाडाच्या घरांची पुण्यात ऑनलाईन सोडत


मागील वर्षीही ऑनलाईन सोडत: यापूर्वी पुण्यात 18 ऑगस्त, 2022 रोजी म्हाडाकडून घरांची सोडत करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या 5 हजार 211 घरासाठींची सोडत जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली होती.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडत: पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी शुभारंभ करण्यात आला होता. पुणे विभागाच्या म्हाडाच्या घरांची सोडत ऑगस्ट, 2022 मध्ये पुण्यात पार पडली होती. पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या 5 हजार 211 घरासाठींची सोडत जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली होती. 5 हजार 211 घरासाठी म्हाडाकडे सुमारे 71 हजार 772 अर्ज आले होते. त्यानुसार या घरांची सोडत अतिशय पारदर्शकरीत्या पार पडल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली होती.

हेही वाचा: Covid-19: कोविड-19 च्या काळात भारतात गरिबी वाढल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा -अरविंद पानगढिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.