महाराष्ट्र

maharashtra

चिमुकल्यानं हट्ट केला अन् मुख्यमंत्र्यांनी कापला केक; कोल्हापुरात नेमकं काय घडलं? - CM Eknath Shinde in Kolhapur

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 9:19 AM IST

Updated : Apr 28, 2024, 9:26 AM IST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेऊन लहानग्याचा वाढदिवसा साजरा केला. त्यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

CM Eknath Shinde
लहानग्यानं हट्ट केला अन् मुख्यमंत्र्यांनी कापला केक; कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

लहानग्यानं हट्ट केला अन् मुख्यमंत्र्यांनी कापला केक

कोल्हापूर CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले होते. यावेळी शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील बापट कॅम्पमधील अनंतपुरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लहानग्याचं मन राखून मुख्यमंत्र्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळं 'जनसामान्यांचे मुख्यमंत्री' ही ओळख पुन्हा एकदा शिंदेंनी अधोरेखित केली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांनी कापला केक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री काही कामानिमित्त शहरातील अनंतपुरम सोसायटीमध्ये आले होते. यावेळी या सोसायटीमध्येच राहणाऱ्या रिधान चावला या पाच वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण, लहानग्या रिधाननं काहीही करुन मुख्यमंत्र्यांसोबतच वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट आपल्या पालकांकडं धरला. अखेरीस पालकांनी धीर करुन मुख्यमंत्री या इमारतीमधून खाली उतरत असताना त्यांना रिधानसोबत वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी लहानग्या रिधानला आणि त्याच्या पालकांना केक घेऊन जवळ बोलावलं आणि रिधानचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पालक आणि मित्रमैत्रिणींच्या साथीनं केक कापून रिधानचा वाढदिवस साजरा केला. तसंच हा केक त्याला भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांची कृती ठरतेय चर्चेचा विषय : आपले सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिधानसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. यामुळं रिधानच्या पालकांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता. 'सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री' अशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी ओळख आहे. लहानग्या रिधानचं मन राखून मुख्यमंत्र्यांनी आपली हीच ओळख नव्यानं अधोरेखित केली. त्यांची ही कृती कोल्हापूरमध्येही चर्चेचा विषय ठरली.

हेही वाचा :

  1. "...हे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?", कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह ठाकरे गटावर हल्लाबोल - PM Narendra Modi
  2. विरोधक जिंकतात त्यावेळी ईव्हीएम मशीन बरोबर, मग हरतात तेव्हा आक्षेप का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न तर राऊतांचा फडणवीसांवर भ्रष्टाचाराचा आरोप - CM Eknath Shinde
  3. दादर चैत्यभूमी येथे मतदार जनजागृतीसाठी विशेष स्वाक्षरी मोहीम; मुख्यमंत्री, राज्यपालांचा मोहिमेत सहभाग - Mumbai District Office Campaign
Last Updated :Apr 28, 2024, 9:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details