महाराष्ट्र

maharashtra

शाहरुख आणि रणवीरची अनंत-राधिकांच्या प्री-वेडिंग पार्टीत ड्वेन ब्राव्होसह पोज

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 11:16 AM IST

Anant Radhika Merchant prewedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याला शाहरुख खान आणि रणवीर सिंगही उपस्थित होते. त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ड्वेन ब्राव्होची भेट घेतली आणि त्याच्यासह फोटोसाठी पोजही दिली आहे.

Anant  Radhika Merchant prewedding
प्री-वेडिंग पार्टीत ड्वेन ब्राव्हो

जामनगर (गुजरात) - Anant Radhika Merchant prewedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्नाआधीचे सेलिब्रेशन जगभर चर्चेचा विषय ठरले आहे. आघाडीच्या बॉलिवूड सेलेब्रिटींसह आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले सेलेब्रिटी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे हा विवाहपूर्व भव्य सोहळा नेत्रदीपक ठरत आहे.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी या वर्षाच्या अखेरीस उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी विवाहबंधनात अडकणार आहे. पहिल्या दिवसाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान ळशाहरुखही झळकला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ड्वेन ब्राव्होने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वत: शाहरुख खान आणि रणवीर सिंग या कार्यक्रमातील फोटो शेअर केले.

शाहरुख खान त्याच्या सिग्नेचर ब्लेझर सेट लूकमध्ये नेहमीप्रमाणेच देखणा दिसत होता. ब्राव्होने पांढरा शर्ट आणि मॅचिंग पॅन्ट घातली होती जी त्याने काळ्या आणि पांढऱ्या पट्टेदार ब्लेझरसह जोडली होती. अभिनेता रणवीर सिंग पांढरा सूट परिधान केल्यामुळे तो अधिक सुंदर दिसत होता. फोटो शेअर करत ब्राव्होने लिहिले, "वेडिंग वाइब्स! मोठ्या मुलांसह मस्ती! बॉलिवूडच्या शाहरुख आणि रणवीरचा क्रिकेट चँपियनशी भेट."

फोटो शेअर होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका यूजरने लिहिले की, "बॉलिवुड किंग खानच्या बादशाहसोबत ब्रावो."दुसऱ्या युजरने कमेंट केली, "चॅम्पियन विथ किंग."

जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाचा तीन दिवसीय विवाहपूर्व उत्सव सुरू झाला आहे. पॉप सेन्सेशन रिहानाच्या परफॉर्मन्सपासून ते खास ड्रोन शोपर्यंत, अंबानींचा हा तीन दिवसांचा प्री-वेडिंग फेस्टिव्हल हा एक भव्य सोहळा साजरा होत आहे. सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपर्यंत, विविध क्षेत्रांतील दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी पोहोचले आहेत.

दरम्यान, वर्क फ्रंटवर शाहरुख नुकताच 'डंकी' चित्रपटात दिसला होता. 'डंकी' मध्ये शाहरुख खानसह बोमन इराणी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी भूमिका केल्या होत्या.

रणवीर सिंग कामाच्या आघाडीवर रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामा 'सिंघम अगेन' मध्ये सिम्बाच्या भूमिकेत परतणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोण, अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर खान यांच्याही भूमिका आहेत. रणवीर फरहान अख्तरच्या 'डॉन 3' चित्रपटातही मुख्य भूमिका साकारत आहे.

हेही वाचा -

  1. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी सेलेब्रिटींची वर्दळ वाढली
  2. मुकेश अंबानी यांनी वाढले पाहुण्यांना जेवण, राधिका-अनंतच्या विवाहपूर्व विधींना सुरुवात
  3. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांनी लग्न विधी सुरू होण्यापूर्वी केली 'अन्न सेवा'

ABOUT THE AUTHOR

...view details