महाराष्ट्र

maharashtra

सानिया मिर्झानं एकतर्फी घटस्फोट दिल्यानंतर पहिल्यांदाच शोएब मलिकनं सोडलं मौन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 2:52 PM IST

Shoaib Malik and sania mirza : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकनं लग्नानंतर होण्याऱ्या चर्चांवर मौन बाळगले होते. त्यानं एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल आणि सानियापासून वेगळे होण्याबद्दलचा खुलासा केला आहे.

Shoaib Malik and sania mirza
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा

मुंबई - Shoaib Malik and sania mirza :पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं असून सोशल मीडियावर या समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांनी याप्रकरणावर सांगितलं की, त्यांच्या मुलीनेच शोएबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणावर शोएब मलिकने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता त्यानं मौन सोडले आहे. शोएबनं एका पॉडकास्टमध्ये त्याच्या लग्नाबद्दल आणि सानियापासून वेगळे होण्याबद्दल सांगितलं आहे.

शोएब मलिकनं केला खुलासा: शोएबनं म्हटलं, ''लोकांचे ऐकण्याऐवजी आपल्या मनाचे ऐकले पाहिजे. आपले मन जे सांगेल ते आपण केले पाहिजे. लोक काय म्हणतील, काय विचार करतील हे समजायला तुम्हाला वर्षे लागली तरी, तुम्ही पुढे जा आणि तुमचे काम करा. हे समजण्यासाठी तुम्हाला 10 वर्षे किंवा 20 वर्षे लागतील. 20 वर्षांनंतरही तुम्हाला सर्व काही समजले असेल, तर तुम्ही पुढे जा." दरम्यान दुसरीकडे एका निवेदनात सानियाच्या कुटुंबातील एका सदस्यानं लिहिलं होत की, ''सानियानं तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. मात्र, याबद्दल सर्व काही समोर येण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तिचा आणि शोएबचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला आहे. सानियानंही शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.''

सानिया शोएबची दुसरी पत्नी : या निवेदनात पुढं असं लिहिलं होतं की, ''सानियाच्या आयुष्यातील या संवेदनशील वेळी आम्ही सर्व चाहते आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही अफवा पसरू नये. तिला एकांताची गरज आहे.'' यापूर्वी, सानियाचे वडील इमरान मिर्झा सांगितलं होत की, ''हा एक 'खुला' आहे.'' 'खुला'चा अर्थ असा की मुस्लिम महिला पतीला एकतर्फी घटस्फोट देऊ शकतात. सानियानं शोएबला एकतर्फी घटस्फोट दिलेला आहे. दरम्यान, सानिया ही शोएब मलिकची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी त्यानं भारतीय महिला आयशा सिद्दीकीशी लग्न केलं होतं. 2010 मध्ये त्यानं भारतीय टेनिस स्टार सानियाशी लग्न केलं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर दोघेही पालक झाले. या दोघांना एक मुलगा आहे, त्याचे नाव इझान मिर्झा मलिक आहे. आता दोघेही लग्नाच्या 13 वर्षानंतर वेगळे झाले आहेत.

हेही वाचा :

  1. मलायका अरोरा आणि करीना कपूरनं अमृता अरोराला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
  2. तृप्ती डिमरीच्या बर्थडे पोस्टने सॅम मर्चंटसोबत डेटिंगच्या अफवांना पुन्हा उजाळा
  3. धर्मेंद्रसोबतच्या किंसिंग सीनमुळे तब्बूनं उडवली शबाना आझमीची खिल्ली

ABOUT THE AUTHOR

...view details